बेळगाव:
हजारोंच्या जनसमुदायाच्या उपस्थितीत बेळगाव लोकसभा उमेदवार जगदीश शेटर यांनी शक्ती प्रदर्शन करून आपला नामांकन पत्र सादर केले बेळगाव लोकसभा निवडणूक ही चुरशीची होणार असल्याचे चित्र आता स्पष्ट होऊ लागले आहे कारण लोकसभा उमेदवार जगदीश शटर यांनी जमा केलेला जनसमुदाय पाहिला तर निश्चितच ही निवडणूक चुरशीची होणार यात शंका नाही बेळगाव येथील समादेवी गल्लीतून भव्य शक्ती प्रदर्शन रॅली ची सुरुवात करण्यात आली, या रॅलीमध्ये भारतीय जनता पक्षाचे माझी मुख्यमंत्री बी एस येडुरप्पा गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत अरभावीचे आमदार भालचंद्र जारकीहोळी भाजपा राज्य उपाध्यक्ष अनिल बेनके माजी आमदार संजय पाटील अभय पाटील बेळगावच्या महापौर सह अनेक नेते या वाहनांमध्ये उभा राहून मतदारांना हात उंचावून मतयाचना करत होते शक्ती प्रदर्शन रॅलीमध्ये ग्रामीण भागासह शहरी भागातील अनेक युवा कार्यकर्त्या सह महिला कार्यकर्त्यांनी ही भाग घेतला होता, तर महिला भजनी मंडळ व ढोल ताशाच्या गजरात ही रॅली पुढे पुढे सरकत होती, यापूर्वी काँग्रेस पक्षाच्या वतीने ही शक्ती प्रदर्शन करण्यात आले होते, यालाच प्रतिउत्तर म्हणून भाजपानेही रॅली काढली यावरून बेळगाव लोकसभा निवडणूक ही चुरशीची होणार यात तीळ मात्र शंका नाही,