बेळगाव:
बेळगावच्या ज्येष्ठ स्त्री रोग तज्ञ व सामाजिक कार्यकर्त्या डॉ. शकुंतला गिजरे यांचा नुकतेच निधन झालं. त्यांनी बेळगावच्या सामाजिक, साहित्यिक सांस्कृतिक आणि वैद्यकीय क्षेत्रात मोठ योगदान दिलेल आहे. विविध सामाजिक संस्थांच्या वतीने त्यांना आदरांजली वाहण्यासाठी सरस्वती वाचनालयातर्फे बुधवार दिनांक 26 जून रोजी सायंकाळी पाच वाजता शोकसभेचे आयोजन केलेले आहे. संबंधित सर्व संस्थांनी या शकुंतला गिजरे सभागृह कोरे गल्ली येथे उपस्थित राहावे असे वाचनालयाकडून कळविण्यात आलेले आहे.