राजहंसगड (ता. जि. बेळगाव) येथे “हिंद केसरी देवा” लहान गट बैलगाडी शर्यतीचा भव्य सोहळा 17 व 18 एप्रिल 2026 रोजी रंगणार असून, या शर्यतीची परिसरात मोठी चर्चा रंगली आहे. पारंपरिक बैलगाडी शर्यतीचा थरार अनुभवण्यासाठी आणि आपली बैलजोडी सिद्ध करण्यासाठी हौशी मालकांना सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे.
या स्पर्धेसाठी प्रवेश फी 2500 रुपये ठेवण्यात आली असून, प्रत्येक जोडीसाठी 1 मिनिटाची वेळ निश्चित करण्यात आली आहे. विजेत्यांसाठी आकर्षक बक्षिसांची रेलचेल असून, प्रथम क्रमांकाला 25,000 रुपये व मानाची गदा, तर इतर क्रमांकांसाठीही रोख पारितोषिके व विविध उंचीच्या ढाली देण्यात येणार आहेत.
या सोहळ्याला कर्नाटक राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा बेळगाव ग्रामीण आमदार सौ. लक्ष्मीताई हेब्बाळकर प्रमुख उपस्थित राहणार आहेत. उद्घाटन हर्षा शुगर्सचे मॅनेजिंग डायरेक्टर व युवा काँग्रेस नेते श्री. मृणाल हेब्बाळकर यांच्या हस्ते होणार असून, दीपप्रज्वलन श्री. मधुकर पवार यांच्या हस्ते पार पडणार आहे. फोटो पूजन कार्यक्रमाला विधान परिषद सदस्य श्री. चरणराज हट्टीहोळी यांची उपस्थिती राहणार आहे.
शर्यतीचे आयोजन सिद्धाप्पा देमाणा छत्रे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले असून, लक्ष्मण थोरवत, आनंद चव्हाण, गुरुदास लोख आदींसह शर्यत कमिटीचे सदस्य परिश्रम घेत आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पी. जी. पवार सर करणार आहेत.
शर्यतीसाठी काही नियम व अटी निश्चित करण्यात आले असून, गाडीवर एकच व्यक्ती, चाबूक व दांडीमध्ये दोन व्यक्ती असणे आवश्यक आहे. चौथ्या व्यक्तीने हस्तक्षेप केल्यास जोडी रद्द केली जाईल. तसेच 100 फुटांच्या आत जोडी रद्द झाल्यास पुन्हा एक संधी दिली जाणार आहे. अंतिम निर्णय शर्यत कमिटीचा राहणार आहे.
या पारंपरिक क्रीडा स्पर्धेला मोठ्या संख्येने प्रेक्षक उपस्थित राहण्याची शक्यता असून, आयोजकांनी सर्वांना उपस्थित राहून या थरारक शर्यतीचा आनंद लुटण्याचे आवाहन केले आहे


राजहंसगडमध्ये ‘हिंद केसरी देवा’ बैलगाडी शर्यतीचा थरार; 17-18 एप्रिलला रंगणार जल्लोष
Related Posts
कन्नडसक्ती आंदोलनातील हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे – महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे आवाहन
Spread the loveकन्नडसक्ती आंदोलनातील हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे – महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे आवाहन महाराष्ट्र एकीकरण युवा समितीची बैठक युवा समिती कार्यालय कावळे संकुल टिळकवाडी बेळगाव येथे…
*गोव्याला जाणाऱ्या सुवर्णकार कामगारांच्या दरोड्याचा पर्दाफाश; आठ जण अटकेत, 40.50 लाखांचा मुद्देमाल जप्त*
Spread the loveबेळगाव : गोव्याला जात असलेल्या चिन्नाभूषण (सोन्याचे दागिने) तयार करणाऱ्या कामगारांचे अपहरण करून पिस्तूल व चाकूचा धाक दाखवत दरोडा टाकल्याप्रकरणी पोलिसांनी आठ आरोपींना अटक केली असून, त्यांच्याकडून सुमारे…
