भीमस्वराज्य युवक मंडळ तुडये यांच्या वतीने विश्वरत्न, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त संस्कृतीक कार्यक्रम आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार कार्यक्रम आयोजित केला होता. कार्यक्रमचा कार्यक्रमाच्या उदघाटणासाठी आमंत्रित केले होते. छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य हे खऱ्या अर्थाने पुढे नेण्याचं काम संविधानाच्या माध्यमातून बाबासाहेबानी केलं, शिवराय ते भीमराव, स्वराज्य ते संविधान, मनगटात शिवराय आणि डोक्यात भिवराव जर असतील तर उभ्या आयुष्यात कुणासमोर झुकण्याची वेळ येणार नाही असे मनोगत शुभम शेळके यांनी व्यक्त केले.
कोल्हापूर जिल्हा, चंदगड तालुका आणि तुडये गाव सदैव सीमावासियांच्या पाठीशी खंबीर असल्याची ग्वाही ग्रामस्थानकडून देण्यात आली,
यावेळी व्यासपीठावर
श्री विलास नाईक सभापती चंदगड ,विलास सुतार सरपंच ग्रामपंचायत तुडिये , जगन्नाथ हुलजी माजी सभापती , भरमाना गावडा, पंचायत समिती सदस्य सौ प्रेमा जगन्नाथ हुलाजी,मारुती पाटील , हनमंत पाटील तसेच युवा समिती सीमाभाग चे कार्याध्यक्ष धनंजय पाटील, सरचिटणीस मनोहर हुंद्रे, अशोक घगवे, मोतेस बारदेसकर यांच्यासह इतर मान्यवर आणि तुडये ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

