बेळगाव : वृद्ध व्यक्तीची देखभाल करण्यासाठी ठेवलेल्या व्यक्तीनेच विश्वासघात करत घरातील लाखो रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यांची चोरी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. कॅम्प पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी या प्रकरणाचा अवघ्या काही दिवसांत छडा लावत दोन आरोपींना अटक केली असून, चोरीस गेलेले दागिनेही जप्त करण्यात आले आहेत, अशी माहिती शहर पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे राहुल कांबळे आणि बाबासाहेब काटगेरी अशी आहेत. विश्वनाथ नावाच्या वृद्ध व्यक्तीच्या प्रकृतीची काळजी घेण्यासाठी राहुल कांबळे याला त्यांच्या मुलांनी घरी ठेवले होते. घरात नियमित वावर असल्यामुळे राहुलने तिजोरीतील सोन्याच्या दागिन्यांची माहिती मिळवून हळूहळू चोरी करण्यास सुरुवात केली.
गेल्या तीन महिन्यांपासून कोणालाही संशय न येऊ देता त्याने तिजोरीतून सोन्याचे दागिने लंपास केले. तपासात सुमारे ९३० ग्रॅम वजनाचे तब्बल ७३.३० लाख रुपयांचे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याचे समोर आले.
या चोरीतील दुसरा आरोपी बाबासाहेब काटगेरी याने हे दागिने मुथूट फायनान्समध्ये गहाण ठेवून पैसे उचलल्याचे तपासात स्पष्ट झाले. कॅम्प पोलिसांनी तांत्रिक माहिती आणि ठोस पुराव्यांच्या आधारे दोन्ही आरोपींना अटक करून चोरीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
घरात मोठ्या प्रमाणात सोन्याचे दागिने न ठेवता ते बँकेच्या लॉकरमध्ये सुरक्षित ठेवावेत, असे आवाहन पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी नागरिकांना केले. या गुन्ह्याचा जलद छडा लावणाऱ्या कॅम्प पोलीस ठाण्याच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे त्यांनी कौतुक केले असून, विशेष कामगिरी करणाऱ्या पोलिसांना विभागाकडून बक्षिसे दिली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी डीसीपी नारायण बारामणी, निरंजन राजे आरस यांच्यासह अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
वृद्धाची सेवा करण्याच्या बहाण्यानेच लाखोंच्या सोन्यावर डल्ला; कॅम्प पोलिसांनी दोन आरोपींना ठोकल्या बेड्या
Related Posts
महाराष्ट्र एकीकरण युवा समिती शैक्षणिक उपक्रम २०२६* *इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांची पटसंख्या पाठविण्याचे आवाहन
Spread the love*महाराष्ट्र एकीकरण युवा समिती शैक्षणिक उपक्रम २०२६* *इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांची पटसंख्या पाठविण्याचे आवाहन सालाबाद प्रमाणे मातृभाषेतील शाळेत प्रवेश घेऊन मातृभाषेतून शिक्षण घेणाऱ्या इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन म्हणून महाराष्ट्र…
सावगाव मराठी शाळेत कन्नड शाळेला विरोध; ग्रामस्थांच्या भूमिकेनंतर पर्यायी जागेचा निर्णय
Spread the love सावगाव येथील मराठी प्राथमिक शाळेत कन्नडी शाळा सुरू करण्याचा घाट घालण्यात आला यामुळे संपूर्ण मराठी भाषिकांत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली यावेळी जिल्हा शिक्षणाधिकारी यांना मोठ्या संख्येने…
