हंदिगनूर येथील श्री महालक्ष्मी यात्रा उत्सवाच्या पार्श्वभूमीवर डेली व्ह्यू न्यूज व संदेश न्यूज यांच्या संयुक्त नेतृत्वाखाली, श्री महालक्ष्मी यात्रा कमिटीच्या सहकार्याने प्रकाशित करण्यात आलेल्या विशेष अंकाला भाविकांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. या विशेष अंकातून श्री महालक्ष्मी यात्रेचा इतिहास, सात गावांची परंपरा व सांस्कृतिक वारसा प्रभावीपणे मांडण्यात आला असून, यामुळे यात्रेच्या यशस्वी आयोजनाला मोठी चालना मिळाल्याचे यात्रा कमिटीच्या सदस्यांनी सांगितले.
गेल्या दोन महिन्यांपासून यात्रेसंदर्भात सातत्याने प्रभावी बातम्या प्रसिद्ध करून भाविकांमध्ये जागृती निर्माण करण्यात आली. त्यामुळे यात्रेकडे मोठ्या प्रमाणात भाविक आकर्षित झाले आणि उत्सव अधिक भव्य व यशस्वी झाला, असेही त्यांनी नमूद केले.
या विशेष अंकामध्ये यात्रेशी संबंधित महत्त्वपूर्ण माहिती, धार्मिक कार्यक्रम, परंपरा आणि गावांचा इतिहास यांचा समावेश करण्यात आला होता, ज्यामुळे भाविकांना यात्रेचे महत्त्व अधिक समजले.
डेली व्ह्यू न्यूजचे संपादक महादेव पवार आणि श्री लक्ष्मीनारायण फाऊंडेशनचे संस्थापक यल्लोजी पवार यांच्या विशेष प्रयत्नांमुळे यात्रेची माहिती घराघरात पोहोचली. या उपक्रमाची सर्वत्र चर्चा होत असून, यात्रा कमिटीने डेली व्ह्यू न्यूजचे मनापासून अभिनंदन व कौतुक केले आहे.


डेली व्ह्यू न्यूजच्या विशेष अंकामुळे हंदिगनूर महालक्ष्मी यात्रा ठरली भव्य यशस्वी
Related Posts
भरधाव दुचाकीची धडक; एम. के. हुबळीतील 59 वर्षीय व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू
Spread the loveकित्तूर : भरधाव आणि निष्काळजीपणे चालविलेल्या दुचाकीच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या एम. के. हुबळी येथील 59 वर्षीय व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. मृत व्यक्तीचे नाव…
आरसीबीच्या विजयाचा जल्लोष पाहायला निघालेल्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू; बुलेट दुचाकी डिव्हायडरवर आदळली
Spread the loveबैलहोंगल शहरात आरसीबीच्या आयपीएल विजयानंतरचा जल्लोष पाहण्यासाठी निघालेल्या एका तरुणाचा भीषण रस्ता अपघातात मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. विनायक अनिल रायर (वय 23, रा. बसवनगर, 4 था…
