हुक्केरी: बेळगाव-संकेश्वर राष्ट्रीय महामार्ग (एनएच-४) वरील हत्तरगी टोलनाक्याजवळ झालेल्या भीषण अपघातात कंटेनर चालकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
यमकनमर्डी पोलिस ठाणे हद्दीतील हंचनाळ गावाजवळील शिवप्रसाद हॉटेलसमोर 3 जून रोजी मध्यरात्री सुमारे 12.30 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. जयकुमार एस. सेल्लादुराई (वय 34, रा. कुपैपट्टी, ता. नत्तम, जि. दिंडीगुल, तामिळनाडू) हे टीएन-42 एएस-1566 क्रमांकाचा आयशर कंटेनर घेऊन संकेश्वरहून बेळगावकडे जात होते.
यावेळी भरधाव वेगाने व निष्काळजीपणे वाहन चालवत असताना त्यांच्या कंटेनरची समोरून जात असलेल्या एमएच-12 टीव्ही-6767 क्रमांकाच्या ट्रकला मागून जोरदार धडक बसली. धडकेची तीव्रता इतकी होती की कंटेनरचे मोठे नुकसान झाले आणि चालक जयकुमार यांना गंभीर दुखापत होऊन त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
या प्रकरणी ट्रक क्लिनर प्रताप बावूराव तिडके (रा. भोगलवाडी, ता. धारूर, जि. बीड, महाराष्ट्र) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून यमकनमर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक 184/2026 दाखल करण्यात आला आहे.
बीएनएस कलम 281 आणि 106(1) अंतर्गत गुन्हा नोंदवून पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.
या दुर्दैवी अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. तर तामिळनाडूतील जयकुमार यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
हत्तरगी टोलनाक्याजवळ भीषण अपघात; ट्रकला कंटेनरची धडक, तामिळनाडूच्या चालकाचा मृत्यू
Related Posts
हत्तरगी टोलनाक्यावर केएसआरटीसी बसची दुचाकीला धडक; उपचारादरम्यान दुचाकीस्वाराचा मृत्यू
Spread the loveहुक्केरी: हत्तरगी टोलनाक्याजवळ केएसआरटीसी बस आणि दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या प्रकरणी यमकनमर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…
शिरगुप्पीजवळ भीषण अपघात; एनडब्ल्यूकेएसआरटीसी बसची दुचाकीला धडक, दुचाकीस्वार जागीच ठार
Spread the loveकागवाड: कागवाड-शिरगुप्पी मार्गावर एनडब्ल्यूकेएसआरटीसी बस आणि दुचाकी यांच्यात झालेल्या भीषण अपघातात एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी सकाळी घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 2 जून 2026 रोजी…
