बेळगाव जिल्ह्यातील कटकोळ पोलीस ठाणे हद्दीत झालेल्या भीषण अपघातात 23 वर्षीय दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे.
दि. 8 जून रोजी पहाटे सुमारे 4 वाजण्याच्या सुमारास लोकापूर-यरगट्टी मार्गावरील एम. चंदरगी गाव हद्दीत संजु हळी यांच्या शेताजवळ हा अपघात घडला. जीए-06 यू-0565 क्रमांकाच्या टाटा गुड्स ट्रकच्या चालकाने वाहन रस्त्यावर कोणतेही इशारा फलक किंवा सिग्नल न लावता वाहतुकीस अडथळा होईल अशा पद्धतीने उभे केले होते, असा आरोप आहे.
याचवेळी बागलकोटहून बेळगावकडे येत असलेले जगदीश रवी पवार (वय 23, रा. बम्मनगुड्डा तांडा, ता. हुनसगी, जि. यादगिरी) हे त्यांच्या बजाज पल्सर एनएस-125 (क्र. KA-33 EH-0607) दुचाकीवरून प्रवास करत होते. रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकच्या मागील लोखंडी भागाला त्यांची दुचाकी जोरदार धडकली.
या अपघातात जगदीश यांच्या डोक्याला व डाव्या पायाला गंभीर दुखापत झाली असून त्यांचा मृत्यू झाला.
या प्रकरणी कटकोळ पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 111/2026 नोंद करण्यात आला असून भारतीय न्याय संहिता (BNS) 2023 च्या कलम 285 व 106(1) अंतर्गत गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू आहे.
रस्त्यावर इशारा न देता उभ्या केलेल्या ट्रकला दुचाकीची धडक; 23 वर्षीय युवकाचा मृत्यू
Related Posts
दोडवाडा खून प्रकरणाचा पर्दाफाश; तीन आरोपी जेरबंद
Spread the loveबेळगाव : बैलहोंगल तालुक्यातील दोडवाडा गावाजवळ आढळलेल्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाचा उलगडा करत दोडवाडा पोलिसांनी खुनाच्या गुन्ह्यात तीन आरोपींना अटक केली आहे. आरोपींना न्यायालयासमोर हजर करण्यात आले असून त्यांना…
श्री मंगाई देवी यात्रा उत्सव २०२६ ची जय्यत तयारी, १० जुलैला देवीचे गाऱ्हाणे, ११ ऑगस्टला मुख्य यात्रा उत्सव;
Spread the loveबेळगाव : परिसरातील श्रद्धास्थान असलेल्या श्री मंगाई देवीचा वार्षिक यात्रा उत्सव २०२६ यंदाही मोठ्या भक्तिभाव आणि उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. यात्रा उत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात…
