बेळगाव : बैलहोंगल तालुक्यातील दोडवाडा गावाजवळ आढळलेल्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाचा उलगडा करत दोडवाडा पोलिसांनी खुनाच्या गुन्ह्यात तीन आरोपींना अटक केली आहे. आरोपींना न्यायालयासमोर हजर करण्यात आले असून त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
मृताची ओळख फक्किरप्पा मल्लाप्पा किरकासली (वय ३८) अशी झाली आहे. २९ मे रोजी दोडवाडा गावाजवळील शेतातील चिंचेच्या झाडाखाली त्यांचा मृतदेह आढळून आला होता. सुरुवातीला संशयास्पद मृत्यू म्हणून नोंद करण्यात आलेल्या या प्रकरणाचा तपास करताना हा खून असल्याचे निष्पन्न झाले.
तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, फक्किरप्पा यांनी मेंढ्या राखण्याच्या कामासाठी आरोपींकडून आगाऊ रक्कम घेतली होती. त्यानंतर कामाच्या कारणावरून वाद निर्माण झाला. २८ मे रोजी रात्री मद्यधुंद अवस्थेत झालेल्या बाचाबाचीचे रूपांतर हाणामारीत झाले. यावेळी आरोपींनी मारहाण करून कुऱ्हाडीने हल्ला करत फक्किरप्पा यांचा खून केल्याचा आरोप आहे.
या प्रकरणी हलप्पा सहदेवप्पा जावली (२४), मंजुनाथ पुंडलिकप्पा तळवारा (२८) आणि अर्जुन लक्कप्पा चुनप्पा (२५) यांना अटक करण्यात आली आहे. दोडवाडा पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहितेअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बेळगाव जिल्ह्याचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक, बैलहोंगल उपविभागीय पोलीस अधिकारी, कित्तूर सीपीआय आणि दोडवाडा पोलिसांच्या विशेष पथकाने संयुक्त तपास करून गुन्ह्याचा छडा लावला. आरोपींना अटक करणाऱ्या पोलिस पथकाचे जिल्हा पोलीस अधीक्षक के. रामजन यांनी कौतुक केले आहे.
दोडवाडा खून प्रकरणाचा पर्दाफाश; तीन आरोपी जेरबंद
Related Posts
श्री मंगाई देवी यात्रा उत्सव २०२६ ची जय्यत तयारी, १० जुलैला देवीचे गाऱ्हाणे, ११ ऑगस्टला मुख्य यात्रा उत्सव;
Spread the loveबेळगाव : परिसरातील श्रद्धास्थान असलेल्या श्री मंगाई देवीचा वार्षिक यात्रा उत्सव २०२६ यंदाही मोठ्या भक्तिभाव आणि उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. यात्रा उत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात…
प्यास फाउंडेशन’तर्फे तारीहाळ येथील बडेकोळ मठ’मधील ऐतिहासिक विहिरीचे पुनरुज्जीवन*
Spread the love*प्यास फाउंडेशन’तर्फे तारीहाळ येथील बडेकोळ मठ’मधील ऐतिहासिक विहिरीचे पुनरुज्जीवन* तारीहाळ, जून २०२६: तारीहाळ येथील ऐतिहासिक ‘बडेकोळ मठ (ज्याला ‘बडेकोळ मठ नागय्या स्वामी मठ’ म्हणूनही ओळखले जाते) भक्त आणि…
