Spread the love

राजहंसगड : येथील मारुती गल्लीतील विठ्ठल-रखुमाई मंदिराच्या परिसरात ग्रामस्थांच्या सोयीसाठी स्वयंपाकासाठी स्वतंत्र शेड उभारण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. कै. विघ्नेश महादेव पवार यांच्या स्मरणार्थ गीताई फाऊंडेशनतर्फे हा लोकोपयोगी उपक्रम राबविण्यात येत असून स्केटिंग प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर यांच्या पुढाकारातून या कामाला चालना मिळाली आहे.
मंदिराच्या मागील बाजूस सुमारे 33 .× 33 फूट आकाराचे स्वयंपाक भवन उभारण्यात येणार असून धार्मिक पारायण, उत्सव तसेच विविध सामाजिक कार्यक्रमांच्या वेळी गावकऱ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे. या कामासाठी अंदाजे चार ते पाच लाख रुपये खर्च अपेक्षित असून लवकरच हे काम पूर्णत्वास नेण्याचा निर्धार आयोजकांनी व्यक्त केला.
या ठिकाणी पूर्वी असलेली पाण्याची टाकी काढून त्या जागेवर किचन हॉल उभारण्यात येणार आहे. देवस्थान कमिटी व ग्रामस्थांच्या उपस्थितीत या कामाचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी माजी तालुका पंचायत सदस्य सिद्धाप्पा छत्रे, सिद्धाप्पा पवार, बसवंत पवार, श्री छत्रे, शिपया भुर्लकट्टी, हनमंत नावगेकर तसेच गावातील प्रमुख नागरिक व ग्रामस्थ उपस्थित होते.