राजहंसगड : येथील मारुती गल्लीतील विठ्ठल-रखुमाई मंदिराच्या परिसरात ग्रामस्थांच्या सोयीसाठी स्वयंपाकासाठी स्वतंत्र शेड उभारण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. कै. विघ्नेश महादेव पवार यांच्या स्मरणार्थ गीताई फाऊंडेशनतर्फे हा लोकोपयोगी उपक्रम राबविण्यात येत असून स्केटिंग प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर यांच्या पुढाकारातून या कामाला चालना मिळाली आहे.
मंदिराच्या मागील बाजूस सुमारे 33 .×

33 फूट आकाराचे स्वयंपाक भवन उभारण्यात येणार असून धार्मिक पारायण, उत्सव तसेच विविध सामाजिक कार्यक्रमांच्या वेळी गावकऱ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे. या कामासाठी अंदाजे चार ते पाच लाख रुपये खर्च अपेक्षित असून लवकरच हे काम पूर्णत्वास नेण्याचा निर्धार आयोजकांनी व्यक्त केला.
या ठिकाणी पूर्वी असलेली पाण्याची टाकी काढून त्या जागेवर किचन हॉल उभारण्यात येणार आहे. देवस्थान कमिटी व ग्रामस्थांच्या उपस्थितीत या कामाचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी माजी तालुका पंचायत सदस्य सिद्धाप्पा छत्रे, सिद्धाप्पा पवार, बसवंत पवार, श्री छत्रे, शिपया भुर्लकट्टी, हनमंत नावगेकर तसेच गावातील प्रमुख नागरिक व ग्रामस्थ उपस्थित होते.
राजहंसगडमध्ये विठ्ठल-रखुमाई मंदिर परिसरात स्वयंपाक शेड उभारणीचा शुभारंभ
Related Posts
शाहापूरात शिवकालीन युद्धकलेचा थरार; शिवसंस्कृतीचा जाज्वल्य वारसा अनुभवण्याची संधी
Spread the loveशाहापूरात शिवकालीन युद्धकलेचा थरार; शिवसंस्कृतीचा जाज्वल्य वारसा अनुभवण्याची संधी न्यूज: बेळगावातील शाहापूर परिसरात शिवसंस्कृतीचा गौरवशाली वारसा जिवंत ठेवण्याच्या उद्देशाने शिवकालीन युद्धकलेचा भव्य आणि थरारक कार्यक्रम आयोजित करण्यात आला…
येळ्ळूर महाराष्ट्र एकीकरण समिती व महाराष्ट्र मैदानाच्यावतीने वकिलांचा जाहीर सत्कार
Spread the loveयेळ्ळूर महाराष्ट्र एकीकरण समिती व महाराष्ट्र मैदानाच्यावतीने वकिलांचा जाहीर सत्कार येळ्ळूर दि. 17- येळ्ळूरमधील ‘महाराष्ट्र राज्य’ फलक हटवल्यानंतर संपूर्ण सीमाभागात संतापाची लाट उसळली. मराठी भाषीकांच्या हृदयावर घाव घालून…
