बेळगाव : कार पार्किंग, बापट गल्ली येथील श्री स्वामी समर्थ संजीवनी पादुका मंदिरात गुरुवार दि. ५ मार्च २०२६ रोजी श्री स्वामी समर्थ किरीट पूजन सोहळा अत्यंत भक्तिमय वातावरणात उत्साहात पार पडला.
मुंबईहून आणण्यात आलेल्या आकर्षक श्री स्वामी समर्थांच्या किरीटाची शहरातून सनई-चौघड्यांच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीदरम्यान बेळगाव शहरातील गणपती मंदिर, किल्ल्यातील दुर्गा मंदिर तसेच महालक्ष्मी देवी मंदिर अशा प्रमुख मंदिरांना भेट देत देवदेवतांचे आशीर्वाद घेण्यात आले.
त्यानंतर कार पार्किंग येथील श्री स्वामी समर्थ मंदिरासमोर किरीटाचे आगमन होताच मोठ्या भक्तिभावाने स्वागत करण्यात आले. या मिरवणुकीत महिलांनी डोक्यावर कळस घेऊन उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
मंदिर परिसरात विधिवत पद्धतीने पूजाअर्चा करून किरीटाचे उद्घाटन करण्यात आले. यानंतर आरती संपन्न झाली व दुपारी १२:३० वाजता तिर्थ-प्रसादाचे वितरण करण्यात आले. या सोहळ्यास स्वामी भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी येत्या रविवार दि. १५ मार्च २०२६ रोजी श्री स्वामी समर्थ मूर्तीची भव्य मिरवणूक काढण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली. तसेच शुक्रवार दि. २० मार्च २०२६ रोजी श्री स्वामी समर्थ प्रकटदिनानिमित्त आयोजित विविध धार्मिक कार्यक्रमांची रूपरेषा असलेल्या कार्यक्रम पत्रिकेचेही प्रकाशन यावेळी करण्यात आले.

बेळगावात श्री स्वामी समर्थ किरीट पूजन सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न…
Related Posts
हत्तरगी टोलनाक्याजवळ भीषण अपघात; ट्रकला कंटेनरची धडक, तामिळनाडूच्या चालकाचा मृत्यू
Spread the loveहुक्केरी: बेळगाव-संकेश्वर राष्ट्रीय महामार्ग (एनएच-४) वरील हत्तरगी टोलनाक्याजवळ झालेल्या भीषण अपघातात कंटेनर चालकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. यमकनमर्डी पोलिस ठाणे हद्दीतील हंचनाळ गावाजवळील शिवप्रसाद हॉटेलसमोर 3…
हत्तरगी टोलनाक्यावर केएसआरटीसी बसची दुचाकीला धडक; उपचारादरम्यान दुचाकीस्वाराचा मृत्यू
Spread the loveहुक्केरी: हत्तरगी टोलनाक्याजवळ केएसआरटीसी बस आणि दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या प्रकरणी यमकनमर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…
