बेळगाव: एपीएमसी सगटू भाजी मार्केट आणि जाई किसान खासगी मार्केटमधील व्यापाऱ्यांच्या वादावर तोडगा काढण्यासाठी लवकरच बेंगळुरू येथे बैठक आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम व जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत त्यांनी सांगितले की, बेळगाव एपीएमसी सगटू भाजी मार्केटला देशभरात चांगली ओळख असून ती टिकवण्याची जबाबदारी दोन्ही बाजार समिती व व्यापाऱ्यांची आहे. या प्रश्नावर कृषी बाजार मंत्री शिवानंद पाटील यांच्यासमवेत बेंगळुरू मध्ये सविस्तर चर्चा करून तोडगा काढण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, खासगी मार्केटमधून एपीएमसी आवारात स्थलांतरित झालेल्या व्यापाऱ्यांना रिक्त गाळे वाटप करण्याच्या सूचना एपीएमसी सचिवांना देण्यात आल्या. शेतकऱ्यांच्या हितासाठी एपीएमसी कार्यक्षेत्रात पूरक सगटू भाजी मार्केट उभारण्याबाबतही शासन पातळीवर चर्चा करू, असे मंत्री जारकीहोळी म्हणाले.
ही समस्या तात्काळ सुटणारी नसून दोन्ही बाजारातील व्यापाऱ्यांनी समन्वयाने व्यवसाय करावा, असे आवाहनही त्यांनी केले. बैठकीस आमदार आसिफ (राजू) सेठ, जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, पोलीस आयुक्त भूषण बोरसे, जिल्हा पोलीस अधीक्षक के. रामराजन यांसह संबंधित अधिकारी व व्यापारी उपस्थित होते.


व्यापाऱ्यांच्या समस्येसाठी उच्चस्तरीय बैठक; शेतकरी हिताला प्राधान्य
Related Posts
धामणे विभाग महाराष्ट्र एकीकरण समिती कडून मराठी भाषा दिनाचे आवाहन*
Spread the love *धामणे विभाग महाराष्ट्र एकीकरण समिती कडून मराठी भाषा दिनाचे आवाहन* महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागच्या वतीने राजहंसगड येथे मराठी भाषा दिनाचे आचरण शुक्रवार दिनांक २७ फेब्रुवारी रोजी…
स्कायवर्ल्ड एव्हिएशन अॅकॅडमीचा यशोत्सव; विद्यार्थिनींची विमानतळांवर निवड
Spread the loveबेळगाव: स्कायवर्ल्ड एव्हिएशन अॅकॅडमी, बेळगाव येथे आज दुपारी १२ वाजता विद्यार्थ्यांच्या यशाचा गौरव सोहळा उत्साहात पार पडला. प्रमुख पाहुण्या म्हणून मानसिक आरोग्य तज्ज्ञ डॉ. स्फूर्ती मस्तिहोळी उपस्थित होत्या.…
