बेळगाव :
सीमा भागातील मराठी भाषिकांना एकत्रित आणण्यासाठी व त्यांच्या न्याय हक्कासाठी लढवायला महाराष्ट्राचा जरांगे पाटील येत्या एप्रिल 30 तारखेला बेळगाव येथे सभा होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे ,शनिवारी बेळगाव जातीमठ येथे सकल मराठा समाजाची बैठक बोलावण्यात आली होती, या बैठकीमध्ये 30 तारखेला महाराष्ट्राचे लढवय्या जरांगे पाटील यांना सभेमध्ये बोलवण्याचे निश्चित झाले आणि सर्वानुमते निर्णय घेण्यात आला सकल मराठाचे बीज रोवलेले नेते गुणवंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बैठकीमध्ये माजी आमदार मनोहर किनेकर अड अमर येळूरकर, रमाकांत कोंडुसकर, प्रकाश मरगाळे, संजय मोरे विकास कलगटगी, सागर पाटील ,अंकुश केसरकर, श्रीकांत कदम, सह अनेक जण उपस्थित होते, सुरुवातीला अड अमर वेळकर यांनी बैठकीचा मुख्य उद्देश सांगितले त्यानंतर प्रत्येकाने आपले विचार मांडण्याचे आवाहन केले , सकल मराठा समाजाचे प्रमुख गुणवंत पाटील यांनी महाराष्ट्राचे लढवय्या जरांगे पाटील यांना बेळगावला बोलावून पुन्हा एकदा मराठी माणसांचे ताकत वाढवण्यासाठी हा प्रयत्न असणार असून याबरोबर मराठी भाषिकांची जमीन काबीज करून शेतकऱ्यांवरती अन्याय करणाऱ्यांना धडा शिकवलाच पाहिजे यासाठी लढवायला जरांगे पाटील सारखे नेते बोलावून सीमा भागातील मराठी भाषिकावरती होणारा अन्याय दूर करण्यासाठी हा प्रामाणिक प्रयत्न आहे त्याचबरोबर सीमा भागातील 67 वर्ष भिजत पडलेला मराठी भाषिकांचा जिवंत सीमा प्रश्न तडीला नेण्यासाठी या माध्यमातून केला जाणार आहे ,असे म्हणत येत्या 30 तारखेला बेळगाव मध्ये जाहीर सभा होणार असल्याचे त्यांनी सांगितले, या बैठकीमध्ये जाहीर सभे संदर्भात विचार विनय व चर्चा करण्यात आले, मराठी भाषिकांनी एकत्रित येऊन ही सभा यशस्वी करण्याचे आव्हान यावेळी करण्यात आले, सभा यशस्वी करण्यासाठी विशेष टीम तयार करून जनजागृती करण्यात येणार असल्याचेही यावेळी बैठकीमध्ये सांगण्यात आले,