बेळगाव:
प्रति वर्षाप्रमाणे यावर्षीही श्रीराम नवमी निमित्त बेळगाव मध्ये श्रीराम सेना हिंदुस्थानच्या वतीने रामनवमी उत्सव साजरा करण्यात आला, बेळगाव शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर उद्यानापासून श्रीराम प्रभू शोभा यात्रेची सुरुवात करण्यात आली, श्रीराम सेना हिंदुस्तान चे संस्थापक व बेळगावचे ठाण्या वाघ म्हणून ओळखले जाणारे रमाकांत दादा कोंडुसकर यांच्या हस्ते या श्रीराम शोभायात्रीची पूजा करून सुरुवात करण्यात आली, या शोभायात्रेमध्ये मध्यभागी पालखी या पालखीमध्ये राम लक्ष्मण सीता यांची प्रतिमा उत्तम अशी सजावट करून ठेवण्यात आले होते तर भला मोठा आकाराचा श्री हनुमान हलता देखावा पाहण्याजोगवता तर भलीमोठी श्रीराम प्रभूची मूर्ती ही या शोभायात्रेत आकर्षण ठरली होती, युवा वर्गांचा उत्साह पाहण्याजोगा होता डॉल्बीच्या तालात श्रीराम सेनेच्या युवा कार्यकर्त्यांनी उत्साहात नाचत आनंद लुटला राणी कित्तूर चन्नम्मा सर्कल मध्ये डॉल्बीच्या गजरात युवा वर्गाने ताल धरून मौजमजा करत जल्लोष केला चला तर पाहू एक क्षण,, श्रीराम नवमी शोभायात्रा पाहण्यासाठी ग्रामीण भागासह शहरातील युवा वर्गांची मोठी गर्दी पाहायला मिळाली ही शोभायात्रा कित्तूर चन्नम्मा सर्कल पासून पुढे सरकत कॉलेज रोड मार्गे धर्मवीर संभाजी चौकात आल्यानंतर रॅलीचे सांगता करण्यात आली