बेळगाव :
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांची आज हातकणंगले येथे भेट घेतली. महाराष्ट्रातून काहीच प्रतिक्रिया न आल्यामुळे कर्नाटक सरकार कन्नड सक्तीच्या नावाने अतिरेक करतय फक्त व्यवसायिकांनाच नाही तर युवक मंडळांचे सूचना फलक सुद्धा काढले जात आहेत. जय महाराष्ट्र बोलायला सुद्धा मज्जाव केला जातोय. सीमाभागातल्या भयानक परिस्थितीची माहिती दिली. मुख्यमंत्र्यांनी मी आजच दिल्लीला चाललोय केंद्रीय गृहमंत्र्यांशी गांभीर्यपूर्वक चर्चा करतो. सीमालढ्याच्या वकिलांशीही मी बोलतो लवकरच यातून मार्ग काढू असे आश्वासन दिले.
यावेळी बेळगाव वरून म.ए.समिती युवा नेते शुभम शेळके, भागोजीराव पाटील, किरण मोदगेकर, मनोहर हुंदरे, प्रवीण रेडेकर, सचिन दळवी
निपाणी वरून डॉ.अच्युत माने, निपाणी समितीचे अध्यक्ष जयराम मिरजकर, युवा समिती अध्यक्ष लक्ष्मीकांत पाटील, सुनील किरळे, रमेश कुंभार, गणेश माळी आदी उपस्थित होते.