Spread the love

बेळगाव :

लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाच्या केंद्रीय समितीने दुसरी यादी जाहीर केले. त्यामध्ये 20 जणांची डोकेदुखी कमी झाली, पण बेळगाव आणि कारवार मधील इच्छुक उमेदवारांची डोकेदुखी काही दिवसापुरता का होईना वाढली आहे, आता बेळगाव लोकसभा मतक्षेत्रातील उमेदवारी कोणाला मिळणार याकडे मात्र इच्छुक उमेदवार सह जनतेचे लक्ष लागून राहिले आहे. लोकसभा निवडणुकीसाठी भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीने दुसरी यादी जाहीर केली असून कर्नाटकातल्या 20 लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार जाहीर करण्यात आलेले आहेत. बेळगाव लोकसभा क्षेत्रामध्ये सध्या अनेक जण इच्छुक असल्याचे गेल्या महिन्याभरामध्ये उघडकीला आले आहे. यामध्ये महांतेश कवटगी मठ आपले प्रयत्न सुरू ठेवले आहे तर शंकरगौडा पाटील हे गप्प बसले नसून माजी मुख्यमंत्री येडुरप्पा यांच्या संपर्क मध्ये आहेत, तर यापूर्वीच जगदीश शटर हे पुन्हा भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे बेळगावच्या लोकसभा निवडणुकीला उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा सुरू आहे, पण विद्यमान खासदार मंगलाअंगडी ह्याही उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्न चालवण्याची चर्चा उघड झाली आहे. तर दुसरीकडे माजी आमदार संजय पाटील हेही गप्प बसले नसून सध्या हाय कमांडच्या संपर्कात असल्याचे समजून येते यामुळे यामध्ये कोणाचे नाव तिसऱ्या यादीत येणार याकडे साऱ्यांचेच लक्ष लागून राहिले आहे

चिकोडी मधून दुसऱ्यांदा विद्यमान खासदार अण्णासाहेब जोले यांना उमेदवारी देण्यात आली आहे तर बेळगाव आणि कारवार हे बहुचर्चित लोकसभा मतदारसंघ पेंडिंग ठेवण्यात आलेले आहेत. त्यामुळे आता बेळगाव आणि कारवारी या लोकसभा उमेदवारासाठी भाजपचे तिसऱ्या यादीची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

बुधवारी सायंकाळी केंद्रीय निवडणूक समितीने प्रसिद्ध केलेल्या दुसऱ्या यादीत कर्नाटकच्या 20 मतदारसंघाचे उमेदवार जाहीर करण्यात आलेले आहेत.हावेरी माजी मुख्यमंत्री बसवराज बोम्माई धारवाड मधून प्रहलाद जोशी, बागलकोट मधून पी सी गद्दीगौडर, विजापूर रमेश जिगजिनगी, गुलबर्गा उमेश जाधव, बिदर भगवंत खुबा, कोप्पळ डॉ बसवराज क्यातुर, बेळळारी बी श्रीरामलू, दावनगेरे गायत्री सिध्देश्वर, शिमोगा बी एस राघवेंद्र, उडुपी चिक्क मंगळूर कोटा श्रीनिवास पुजारी

मंगळूर मधून कॅप्टन ब्रिजेश चौटा, तुमकुरू व्ही सोमान्ना, मैसूर यदुविर चामराज वडेयर, चाम्राजनगर एस बालराज, बंगळुरु ग्रामीण सी एन मंजुनाथ, बंगळुरु उत्तर शोभा करंदलाजे, बंगळुरु सेंट्रल पी सी मोहन बंगळुरु साऊथ तेजस्वी सूर्या