बेळगाव :
लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र एकीकरण समितीचे इच्छुक उमेदवार म्हणून प्राध्यापक आनंद आपटेकर यांनी आपल्या समर्थकासह शनिवारी अर्ज दाखल केला . बेळगाव जातीमठ येथे पूजाअर्चा करून अर्ज दाखल करण्याच्या शुभ कामाची सुरुवात केली, यानंतर धर्मवीर संभाजी चौकातील संभाजी महाराज यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून थेट महाराष्ट्र एकीकरण शहर समिती कार्यालय कडे येऊन त्याने समितीच्या शिष्टमंडळाकडे आपला इच्छुक अर्ज दाखल केला, यावेळी प्राध्यापक आनंद आपटेकर म्हणाले की महाराष्ट्र एकीकरण समितीच्या ध्येय धोरणसी निगडित राहून आपण हा सीमा प्रश्न जिवंत ठेवण्यासाठी व सीमा भागातील मराठी भाषिकावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आपण प्रामाणिक लढू व युवा पिढीच्या पाठीशी राहून महाराष्ट्र एकीकरण समितीच्या ध्येयधोरणाशी आपण कटिबंध राहो असे म्हणत त्यांनी आपला अर्ज दाखल केला आणि निश्चितच युवा सामान्य कार्यकर्त्याला महाराष्ट्र एकीकरण समिती उमेदवारी देतील अशी आशा व्यक्त केली, यावेळी प्रा. आनंद आपटेकर यांच्या समवेत माजी नगरसेवक देवेंद्र हावळ, श्रीकांत खांडेकर, अनिल जाधव, विनायक पाटील, श्रीनाथ पवार, शिवराज चव्हाण, अभय येळूरकर, स्वप्निल आपटेकर, सौरभ पवार, भरत कागे, ज्योती मंडोळकर, मंगल कदम, प्रांजल मुतकेकर, गजानन कावळे, पप्पू मुतकेकर, प्रवीण कुट्रे, सुरज मुतकेकर, महालिंग रनगट्टीमठ, शटवाजी हसबे, नारायण सावगावकर, मनोज हिंडलगेकर, रूपा राहूल आपटेकर उपस्थित होते.
दरम्यान, शेवटच्या दिवसापर्यंत समितीकडे चार इच्छुकांनी अर्ज दाखल केले आहेत. सोमवार दिनांक ८ एप्रिल रोजी निवड समितीची बैठक होणार असून मुलाखती व इतर सोपस्कार पूर्ण करून त्यानंतर एक अधिकृत उमेदवाराची निवड करण्यात येईल. याकडे समिती कार्यकर्त्यांचे लक्ष लागून राहिले आहे.