बेळगाव :
तानाजी गल्ली येथील श्रीराम युवक मंडळाने बसवन कुडचित खिलार जनावरांचे प्रदर्शन
भरविले होते. गावचे नगरसेवक बसवराज मोदगेकर व समाजसेवक परशराम बेडका तसेच गावचे पंच अप्पूनी चौगुले यांच्या हस्ते श्रीफळ व हार घालून प्रदर्शनाला सुरुवात करण्यात आली. गावातील 35 बैल जोडिंनी यामध्ये भाग घेतला होता. गावातील तानाजी गल्ली येथून बसवाना मंदिर पर्यंत बैलांची मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर दीपप्रज्वलण करून पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला. व सर्व बैलजोडी मालकांना मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले . यावेळी जोतिबा मुतगेकर, नामदेव जैनोजी, निळकंठस्वामी हिरेमठ, डॉ मल्लाप्पा हम्मनावर, नामदेव मुतगेकर,संदीप मुतगेकर,लक्ष्मण मुतगेकर,ओमकार जैनोजी, परशराम पाटणेकर, राजू मुतगेकर, शिवाजी रवळूचे,जोतिबा परीट,महेश मुतगेकर, दिनेश रवळूचे,भरमा हसबे,व श्री राम युवक मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते