Spread the love

बेळगाव :

राजहंसगड येथे आजतागायत गुढीपाडवा तसेच गावातील इतर सर्व धार्मिक कार्यक्रम देवस्थान पंचकमिटीच्या अध्यक्षतेखाली साजरे होतात ,परंतु मागील काही दिवसांपासून राजकीय दबावतंत्र वापरून पंचकमिटी तसेच गावकऱ्यावर दबाव आणून धार्मिक कार्यात खंड पाडण्याचा प्रयत्न सुरू आहे.
गडावरील सिद्धेश्वर मंदिरचे पुजारी शिवानंद मठपती व सविता मठपती यांना पोलीसांकडून वारंवार फोन करुन पोलीस स्टेशनला हजर होण्याची तंबी देत होते ,त्यांनी लागलीच गाव पंचकमिटीला कळविले याबाबत पंच कमिटी तातडीने धनंजय जाधव यांना पोलीस स्टेशन मध्ये हजर झाले व जाब विचारण्यात आला. तसेच यापुढे गावकऱ्यांना कोणत्याही प्रकारचा पोलीसांकडून नाहक त्रास झाल्यास जिल्हाधिकाऱी कार्यालयावर मोर्चा काढून आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा यावेळी धनंजय जाधव यांनी दिला.

मिळालेली सविस्तर माहिती अशी की राजहंसगड किल्यावर 2008 साली एक कमिटी तयार करण्यात आली होती, आणि त्या कमिटीतील अध्यक्ष व सेक्रेटरी यांच्या संगनमताने भ्रष्टाचार करण्यात आला होता, याबाबत गावकऱ्यांनी मोर्चा काढून ती कमिटी रद्द करून त्या दोघांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली होती.
त्यानंतर गावकऱ्यांनी 2022 साली मुजराई विभागातून रितसर कागदपत्रांची पूर्तता करून ट्रस्ट करण्यात आली होती त्याठिकाणी सुद्धा राजकीय दबाव आणून गावाने नेमणूक केलेली ट्रस्ट रद्द करण्यात आली. यावर पुन्हा गावकऱ्यांनी आक्षेप घेत 1952 साली बी,पी,टी कायद्यांतर्गत वंशपरंपरागत पुजार्‍याना सर्व अधिकार देण्याचे ठरविण्यात आले, परंतु अध्यक्ष सिद्धाप्पा छत्रे व सेक्रेटरी भाऊराव पवार हे दोघे राजकीय दबाव आणून पोलीसांकरवी गावातील प्रत्येक धार्मिक कार्यात विघ्न आणण्याचा प्रयत्न करीत आहेत असा आरोप गावकऱ्यांनी केला आहे, तसेच आजतागायत गडावरील परंपरेनुसार होणारा गुढीपाडव्याचा सण खंडित करण्याचा प्रकार सुरू आहे.

याबाबत गावकर्यातून संताप व्यक्त होत असून, पोलीसांनी राजकीय दबावाखाली येऊन गावच्या कार्यात विघ्न आणून नये अशी विनंती गावकऱ्यांच्या व पंचमंडळीच्या वतीने परशुराम पवार यांनी केली आहे. 1950 साली बॉम्बे पब्लिक ऍक्ट मध्ये राजहंसगड किल्ल्यातील पुजारीच्या नावे रजिस्ट्रेशन असल्यामुळे कोणत्याही इलाख्याला यामध्ये हस्तक्षेप करता येणार नाही असे कायदेतज्ञ वकील नंदकुमार पाटील यावेळी म्हणाले वाईट गुढीपाडव्यानिमित्त राजहंस गडावर पालखी नारळ चढवणे असे विविध धार्मिक कार्यक्रम पंचक्रोशीतील भक्तांच्या उपस्थितीमध्ये मोठ्या उत्साहात साजरा केला जातो पण राजकीय दबाव तंत्र मुळे अशा धार्मिक कार्यक्रमावर आळा येतो की काय अशी भीती राजवजगडातील पंचम मंडळी व गावकऱ्यांना भेडसावू लागली आहे