बेळगाव :
निवडणूक प्रचारात सिमाप्रश्नाची सोडवणूक व सीमाभागात होणारी भाषिक सक्ती हा मुद्दा अधोरेखित करावा या मागणीसाठी बेळगाव येथील छत्रपती शिवाजी उद्यान येथे महाराष्ट्रातील प्रमुख नेत्यांना पत्र लिहून हा संदेश पत्राद्वारे पाठवलेला आहे, बेळगाव(कार्यकर्ते)
किरण हुदार,
रोहन लंगरकांडे,
शिवाजी मेणसे,
अध्यक्ष, म.ए. युवा समिती, खानापूर
धनंजय पाटील यांनी या मजकुराची गांभीर्याने आमल बजावणी करावी अशी मागणी केली आहे,
लोकसभा निवडणूक २०२४ नुकतीच जाहीर झाली आहे. महाराष्ट्रात लोकशाहीचा हा उत्सव साजरा करताना आपण सीमावासीयांना विसरून चालणार नाही, गेली ६८ वर्षे आम्ही सिमावासीय पारतंत्र्यात असल्यासारखे जगती आहोत, भाषिक अत्याचार आम्ही सहन करत आहोत, कर्नाटक सरकारने १९८६ साली शिक्षणात कन्नडसक्ती लागू केलीच, पण गेल्या महिनाभरापूर्वी कन्नडसक्ती कायदा पारित करून येथील कानडीकरणाचा वरवंटा अजून तीव्र केला आहे. त्यामुळे पक्षप्रमुख या नात्याने आपल्या जाहीरनाम्यात सीमाप्रश्नाची सोडवणूक व सीमाभागात होणारी भाषिक सक्ती हा विषय समाविष्ट करावा, व महाराष्ट्रातील आपल्या सर्व उमेदवारांना यामुद्यावर जाहीर सभेदरम्यान भाष्य करण्यास आदेश देण्यात यावेत, जेणेकरून आम्हां सीमावासीयांना यातून पाठबळ मिळेल व हा मुद्दा पुन्हा ऐरणीवर येईल, नव्या लोकसभेत तो चर्चिला जाईल व यातून सिमाप्रश्नाची सोडवणूक होईल अशी आमची आशा आहे. असे पत्रात नमूद करून शेवटी सर्व महाराष्ट्रातील उमेदवारांना सीमा वासियाकडून खूप खूप शुभेच्छा असे म्हटले आहे ,