बेळगाव :
ग्रामीण भागामध्ये एक वैशिष्ट्यपूर्ण अशी होळी साजरी केली जाते, प्रत्येक गावांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने होळी साजरी केली जाते, हे खरे आहे, पण या, ना, त्या, कारणामुळे शहर किंवा पर गावी वास्तव्य झालेल्याना नक्कीच गावाकडच्या होळीची आठवण येणारच यात शंकाच नाही, संपूर्ण राज्यात व देशांमध्ये नावारूपाला आलेल्या राजहंसगडाची पारंपरिक होळी एक वेगळीच आहे, शेकडो वर्षापासून राजहंस गडामध्ये गावकरी व पंचमंडळी एकत्र येऊन होळीच्या आदल्या दिवशी शेतवाडी मध्ये जाऊन एक उंच असे वैशिष्ट्यपूर्ण परंपरा असलेले झाड होळीसाठी अगदी धार्मिक पद्धतीने आणले जाते,
यामध्ये गावकरी सह लहान मुलांचाही समावेश असतो एका बैलगाडीतून ही होळी आणून गावच्या सिद्धेश्वर मंदिर समोर ठेवली जाते आणि त्याच सायंकाळी गावातील सर्व गावकरी आपापल्या परीने होळीला नैवेद दाखवून या होळीची पूजाअर्चा करतात आणि दुसरे दिवशी सकाळपासूनच होळी कामांना जाळण्यासाठी पारंपारिक पद्धतीने गावच्या वेशीतून या कामाला शेणकोटीतून आग आणून होळी कामांना जाळला जातो यावेळी सेंनकोटीतुन आग घेऊन येणाऱ्या व्यक्तीवर सेनकोटीचा वर्षाव करत असतात पण याकडे न जुमानता ही व्यक्ती होळी कामाण्याकडे जाऊन होळी कामांनाला आग लावली जाते,
यानंतर कमान्याचे तोंड कोणत्या दिशेला पडते याकडे सारे गावकरी पाहत असतात आणि ज्या ज्या दिशेला या कामान्याचे तोंड झुकते हा भाग यावर्षी पिकतो असे गृहीत गावकरी धरतात अशा या परंपरेत अनेक अर्थ लपलेले असतात म्हणूनच की काय शेकडो वर्षांची परंपरा अबाधित ठेवण्यासाठी प्रत्येक गावातील नागरिक आपापल्या परीने प्रयत्न करत असतात, पण हा क्षण पाहण्यासाठी परगावी वास्तव्य झालेल्या गावातील नागरिकांना या क्षणासाठी मुकावे लागते यामुळे ज्या मातीत आपण जन्मलो त्या मातीकडे निदान अशा धार्मिक कार्यक्रमांना तरी आपली उपस्थिती महत्त्वाचे असते असेच साऱ्यांना वाटते