बेळगाव :
महाभारतामध्ये अर्जुनाला सारथी म्हणून श्रीकृष्णाने महत्त्वपूर्ण भूमिका निभावली त्याच धर्तीवर राजकारणामध्ये माझा मुलगा मृणाल हेब्बाळकर याला माता म्हणून सारथी ची भूमिका मी निभावत आहे , मला विश्वास आहे माझा मुलगा निश्चित मी जसे राजकारणामध्ये जनतेच्या विश्वासाला पात्र आहे त्याच मार्गाने मृणाल ही नक्कीच चालेल असे महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर म्हणाल्या मंगळवारी बेळगाव येथील बार असोसिएशन वतीने आयोजित प्रचार सभेमध्ये आपले भावनिक विचार व्यक्त केले विरोधी पक्ष मृणाल हा अनुभवी नसून कमी वयाचा आहे असे म्हणत जनतेची दिशाभूल करत आहेत , पण ज्या वेळेला जगदीश शटर आमदार म्हणून पहिल्या वेळेला निवडणूक लढवले तेही 31 किंवा 32 वर्षाचे होते माझाही मुलगा आज 31 वर्षाचा आहे, यापुढे त्यांना आपला अनुभव लाभणार आहे आणि जनतेच्या विश्वासाला पात्र ठरेल यात शंका नाही असेही मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर म्हणाल्या, स्थानिक उमेदवाराला फक्त एक वेळ आपले मोलाचे सहकार्य करा याची परतफेड येत्या काळात निश्चितच करेल असा विश्वास यावेळी त्यांनी दिला , यावेळी माजी आमदार फिरोज शेठ सध्याचे आमदार आसिफ शेठ व बार असोसिएशनचे अध्यक्ष किडसनवर वकील संघटनेचे सदस्य व वकील मोठ्या संख्येने उपस्थित होते,