बेळगाव: स्कायवर्ल्ड एव्हिएशन अॅकॅडमी, बेळगाव येथे आज दुपारी १२ वाजता विद्यार्थ्यांच्या यशाचा गौरव सोहळा उत्साहात पार पडला. प्रमुख पाहुण्या म्हणून मानसिक आरोग्य तज्ज्ञ डॉ. स्फूर्ती मस्तिहोळी उपस्थित होत्या. तसेच अॅकॅडमीचे CEO श्री. विनोद बामणे व श्री सरस्वती इन्फोटेकच्या व्यवस्थापकीय संचालिका सौ. ज्योती विनोद बामणे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
या वेळी निवड झालेल्या विद्यार्थिनींचा विशेष सत्कार करण्यात आला. मिस ज्योती हडपद (गोवा), मिस अन्सबा मुल्ला (हळियाळ), मिस संजना ओवुळकर (दांदेली) व मिस भारती कोलकर (बेळगाव) यांची दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळावर निवड झाली आहे. मिस साक्षी हरकर (गडहिंग्लज, महाराष्ट्र) यांची मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर अकासा एअरलाईनमध्ये सुरक्षा अधिकारी म्हणून निवड झाली असून मिस शाहीनबानू (दांदेली) यांची गोवा आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी निवड झाली आहे.
प्रमुख पाहुण्यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांमध्ये नवी उमेद निर्माण झाली. निवड झालेल्या विद्यार्थिनी व त्यांच्या पालकांचा सन्मान करण्यात आला. संस्थेच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी मिळवलेले हे यश अभिमानास्पद असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.


स्कायवर्ल्ड एव्हिएशन अॅकॅडमीचा यशोत्सव; विद्यार्थिनींची विमानतळांवर निवड
Related Posts
व्यापाऱ्यांच्या समस्येसाठी उच्चस्तरीय बैठक; शेतकरी हिताला प्राधान्य
Spread the loveबेळगाव: एपीएमसी सगटू भाजी मार्केट आणि जाई किसान खासगी मार्केटमधील व्यापाऱ्यांच्या वादावर तोडगा काढण्यासाठी लवकरच बेंगळुरू येथे बैठक आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम व जिल्हा पालकमंत्री…
धामणे विभाग महाराष्ट्र एकीकरण समिती कडून मराठी भाषा दिनाचे आवाहन*
Spread the love *धामणे विभाग महाराष्ट्र एकीकरण समिती कडून मराठी भाषा दिनाचे आवाहन* महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागच्या वतीने राजहंसगड येथे मराठी भाषा दिनाचे आचरण शुक्रवार दिनांक २७ फेब्रुवारी रोजी…
