बेळगाव: स्कायवर्ल्ड एव्हिएशन अॅकॅडमी, बेळगाव येथे आज दुपारी १२ वाजता विद्यार्थ्यांच्या यशाचा गौरव सोहळा उत्साहात पार पडला. प्रमुख पाहुण्या म्हणून मानसिक आरोग्य तज्ज्ञ डॉ. स्फूर्ती मस्तिहोळी उपस्थित होत्या. तसेच अॅकॅडमीचे CEO श्री. विनोद बामणे व श्री सरस्वती इन्फोटेकच्या व्यवस्थापकीय संचालिका सौ. ज्योती विनोद बामणे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
या वेळी निवड झालेल्या विद्यार्थिनींचा विशेष सत्कार करण्यात आला. मिस ज्योती हडपद (गोवा), मिस अन्सबा मुल्ला (हळियाळ), मिस संजना ओवुळकर (दांदेली) व मिस भारती कोलकर (बेळगाव) यांची दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळावर निवड झाली आहे. मिस साक्षी हरकर (गडहिंग्लज, महाराष्ट्र) यांची मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर अकासा एअरलाईनमध्ये सुरक्षा अधिकारी म्हणून निवड झाली असून मिस शाहीनबानू (दांदेली) यांची गोवा आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी निवड झाली आहे.
प्रमुख पाहुण्यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांमध्ये नवी उमेद निर्माण झाली. निवड झालेल्या विद्यार्थिनी व त्यांच्या पालकांचा सन्मान करण्यात आला. संस्थेच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी मिळवलेले हे यश अभिमानास्पद असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.


स्कायवर्ल्ड एव्हिएशन अॅकॅडमीचा यशोत्सव; विद्यार्थिनींची विमानतळांवर निवड
Related Posts
वृद्धाची सेवा करण्याच्या बहाण्यानेच लाखोंच्या सोन्यावर डल्ला; कॅम्प पोलिसांनी दोन आरोपींना ठोकल्या बेड्या
Spread the loveबेळगाव : वृद्ध व्यक्तीची देखभाल करण्यासाठी ठेवलेल्या व्यक्तीनेच विश्वासघात करत घरातील लाखो रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यांची चोरी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. कॅम्प पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी या प्रकरणाचा…
खानापूर येथील स्केटिंग स्पर्धा उत्साहात पार*
Spread the love*खानापूर येथील स्केटिंग स्पर्धा उत्साहात पार* बेळगांव जिल्हा रोलर स्केटिंग असो व साई स्पोर्ट्स अकॅडमी खानापूर यांच्या तर्फे खुल्या जिल्हास्तरीय स्केटिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते नुकताच या…
