बेळगाव :
शेतकरी दुष्काळाने होरपळला असता आपल्या आर्थिक गरजा भागवण्यासाठी शेतात खड्डा मारुन त्यात प्लास्टिक घालून पाणी विकत घेऊन येळ्ळूर, शहापूर सह इतर शिवारातील काकडी,खरबूस,कलिंगड,वांगी,मिरची व इतर भाजीपाला महिला पीकवत वडगाव,शहापूर, बेळगाव ,टिळकवाडी भागात विकण्यासाठी घेऊन जातात.हे फक्त हंगामापूरते असते म्हणजे फेब्रुवारी ते मार्च दरम्यान सदर महिला आपल्या बुट्या घेऊन बसमधे घालून घेऊन जातात.पण बस चालक,वाहक महिलांच्या बुट्या घेण्यास टाळाटाळ करतात.आणी महिलानां उद्दट उत्तरं देतात.त्याच प्रमाणे इतर महिला येळ्ळूर,धामणे रस्त्यावरुन बस जातयेत असतात जर शेतकरी महिला बसमधे चढल्या कि मधे आम्ही बस थांबवणार नाही वडगाव ते येळ्ळूर व धामणे गावातच बस थांबवणार म्हणून दादागिरी करतात.मागे रयत संघटनेतर्फे वाहतूक अधिकारी लमाणी यांच्या कार्यालयासमोर आंदोलन केलहोतं तेथे वाहतूक अधिकाऱ्यांनी येळ्ळूर रोडवर बळ्ळारी नाला सिध्दिविनायक मंदीर,शहापूर येळ्ळूर शिवार हद्द,पूढे पेट्रोल पंप या तिन ठिकाणी बस थांबवून शेतकरी महिलांना दिलासा द्यावा म्हणून विनंती केलीहोती.
अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी बस थांबवण्यास सांगितले जाईल म्हणून आश्वासन दिले होते.पण आजपर्यंत सदर ठिकाणी महिला उभे राहिल्यास येताजाता बसचालक बस थांबवून थांबलेल्या महिलानां बसमधे न घेता तशीच जोरात पुढे तसेच निघून जातात पण संध्याकाळी सात पर्यंत ताटकळत थांबलेल्या महिलांची काकळूत बस वाहकाला येतनाही.
हे पाहूनपाहून आज येळ्ळूरच्या शेतकरी महिलांनी रस्त्यावर बस आडवून आंदोलन करत समोर थांबून चालकवाहकाला धारेवर घरल्यावरही महिलांना त्यांच्या बुट्यासह शेवटपर्यंत घेतलच नाही. तोपर्यंत दुपारचे 12.30 वाजले.त्यानंतर आपल्या काकडी,खरबूस व इतर माल सकाळीच विक्री होतो.त्यानंतर विक्री होतनाही म्हणून खासगी रिक्षातून वडगावकडे आल्या.पण येत्या दिवसात जर बस चलाकवाहकांनी बस थांबवली नाही तर एकत्रित येऊन नक्कीच रास्तारोको करुन परिवहन खात्याच्या अधिकाऱ्यांना आंदोलनस्थळी बोलवूनच न्याय मीळवून घेतला जाईल यासाठी तयारी सुरु आहे.
आधी तिकिट होत तेंव्हा हवतिथे बस थांबवत होते पण आता का थांबवत नाहीत त्यासाठी न्याय मागण्यात येणार आहे.या आंदोलनात येळ्ळूर, वडगाव,शहापूर,धामणे येथील महिला व शेतकरी मोठ्या संखेने भाग घेणार आहेत.