कोल्हापूर:
शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर
शैक्षणिक वर्ष २०२२-२०२३ पासून शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूरच्या वतीने सीमा भागातील विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठ परिसरातील अभ्यासक्रमांसाठीची योजना
१. शिवाजी विद्यापीठ परिसरातील अधिविभागामधील जे अनुदानित अभ्यासक्रम आहेत अशा अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना एकूण शुल्कापैकी शैक्षणिक शुल्क व वसतिगृह शुल्क माफ करण्यात येईल. उर्वरित फी विद्यापीठ नियमानुसार लागू राहील. अनुदानित व विनाअनुदानित अभ्यासक्रमांचा तपशील पाठीमागील पानावर नमूद करण्यात आला आहे.
२. विना अनुदानित अभ्यासक्रमास जे विद्यार्थी प्रवेश घेतील अशा विद्यार्थ्यांना ट्युशन फी मध्ये २५% सवलत मिळेल तसेच त्यांच्याकडून वसतिगृह शुल्क घेण्यात येणार नाही ३. सीमा भागातील विद्यार्थ्यांकरीता वसतिगृहाची प्रवेश प्रक्रिया स्वतंत्रपणे राबविण्यात येईल. सदर विद्यार्थ्यांसाठी अधिविभागवार कोटयाची अट ठेवली जाणार नाही.
४. विद्यापीठातील विविध अधिविभागाकडील भाग-१ च्या नियमित अभ्यासक्रमांसाठी सीमाभागातील विद्यार्थ्यांकरीता अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी एकूण प्रवेश क्षमतेच्या १० टक्के जागा अतिरिक्त (Over & Above) राखीव ठेवण्यात येतील.
५. विद्यापीठ अधिविभागात सीमा भागातील जे विद्यार्थी (भाग २, ३, ४ इत्यादी साठी) प्रवेशित असतील तेही वरील अटी व शर्तीच्या अधीन राहून सवलतीस पात्र राहतील. या अनुषंगाने विद्यार्थ्यांनी अधिविभाग प्रमुखांच्याकडे विहीत कागदपत्रे जोडून स्वतंत्रपणे अर्ज करणे आवश्यक आहे.
६ . सीमा भागातील जे विद्यार्थी विद्यापीठातील सर्टिफिकेट, डिप्लोमा, पीजी डिप्लोमा या अभ्यासक्रमांना, तसेच दूरशिक्षण केंद्राकडील अभ्यासक्रमांना प्रवेश घेतात त्यांना सदर योजना लागू नाही.
७. सीमा भागातील विद्यार्थ्यांना पीएच. डी. साठी प्रवेश मिळाल्यानंतर ३ वर्ष वसतिगृह मोफत उपलब्ध होईल.
८ . ज्या अभ्यासक्रमांना महाराष्ट्र शासनामार्फत व केंद्र शासनार्फत (All India Level) सीईटी घेवून प्रवेश निर्धारित होत असतो अशा विद्याथ्यर्थ्यांना प्रवेश मिळाल्यानंतरच उपरोक्त
सवलती अटी व शर्तीच्या अधीन राहून योजना लागू होतील. ९. शिवाजी विद्यापीठ अधिविभागातील नियमित अनुदानित व विनाअनुदानित पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी सीमा भागातील विद्यार्थ्यांना खालील अटी व शर्तीच्या अधीन
राहून सदर योजनेचा लाभ देण्यात येईल.
अ) मराठी भाषिक उमेदवारांनी ते महाराष्ट्र शासनाने दावा केलेल्या ८६५ गावातीलच रहिवाशी असल्याबाबतचा त्यांच्या १५ वर्षे वास्तव्याचा सक्षम प्राधिकाऱ्याचा विहीत नमुन्यातील दाखला सादर करणे अनिवार्य राहील.
ब) सीमा भागातील गावातील पुढील विद्यार्थ्यांना प्राधान्य मिळेल.
i) १० वी पर्यंत ज्यांचे शिक्षण मराठीत झाले आहे. ii) ज्यांचा १० वीला मराठी विषय आहे. iii) जे आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहेत.
१०. ज्या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे अशा विद्यार्थ्यांना केंद्र व राज्य सरकार
यांच्याकडून दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्ती / सवलती योजनांचा लाभ घेता येणार नाही.
११. सीमा भागातील ज्या विद्यार्थ्यांना सदर सवलतीचा लाभ मिळेल त्यांनी सदर अभ्यासक्रम विहीत मुदतीत पूर्ण करणे आवश्यक आहे.