बेळगाव :
जी एस एस पी यु काॅलेजच्या भौतिकशास्त्र विभागाच्या गॅलीलीयो क्लब च्या वतीने विज्ञान दिन साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचे मूळ उद्दिष्ट विद्यार्थी वर्गामध्ये खगोलशास्त्र आणि तारांगण या विषयीच्या ज्ञानात भर घालने व या विषयाबद्दल जागृती निर्माण करणे, या कार्यक्रमात खगोलशास्त्रीयाकडून,तारांगणाचा अभ्यास करण्यास ,त्यांच्या परिक्रमाचे आणि विलक्षण रुपाचे दर्शन करण्यासाठी वापरात येणारी विविध सामग्री, विविध आकाराच्या दुर्बिणी, या बद्दलची माहिती देणारया चित्रफिती दाखवण्यात आल्या ,क्लब प्रमुख आणि ईतर शिक्षक यांचे स्वागत प्राचार्य सुभाष देसाई यांनी केले.
विद्यार्थी वर्गामध्ये जागृती आणि जबाबदारी येण्यासाठी प्रा विनय नाईक आणि विद्यार्थी प्रतिनिधीनी सर्व उपस्थितांस शपथबद्द केले.
चित्र फित आणि संबंधित माहिती प्रा अभिजीत गवस आणि प्रा रोहित पूरेकर यांनी प्रस्तुत केली.