बेळगाव :
बऱ्याच वर्षापासून रयत गल्ली शेतकरी कमीटीने शहापूर तलाव खुदाईसाठी सरकारदरबारी प्रयत्न केले.कारण त्या तलावाभोवती रयत गल्लीतील शेतकऱ्यांची शेतीच जास्त आहे. मागील मुख्यमंत्री कुमारस्वामीपासून बोमाई पर्यंत सदर तलाव खुदाईसाठी वेळोवेळी लेखी निवेदन पाठवले.पण कांही उपयोग झाला नाही.कर्नाटक सरकारने दरवर्षी शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवल्या त्यात शेतीच्या मधे असलेले तलाव जिवंत करण्यासाठी त्यांची खुदाई करुन त्यात बारमाही पाणी साठा रहाण्यासाठी तलाव भरण योजनां आखून जर त्यात पाणी नसल्यास परिसरातील नदी किंवा धरणाचे पाणी त्यात सोडून परिसरातील शेतीचा आंतरजलसाठा अबाधित राहिल्यास शेतकऱ्यांना पीकं घेण्यासाठी दिलासा मीळेल.अशी त्यामागील धारणा.पण बेळगावसह परिसरातील अनेक तलाव त्या योजनापासून अलिप्तच राहिले.त्यातील एक तलाव म्हणजे शहापूर तलाव.
2024 साली अस्तित्वात आलेल्या कर्नाटकात काँग्रेस सरकार मधील बेळगाव जिल्हा पालकमंत्री मा.सतीश जारकिहोळी यांच्या जनतादरबार कार्यक्रमात शहापूर तलाव खुदाई संदर्भात शेतकरी कमीटी व इतर शेतकरी बंधूतर्फे निवेदन दिलेल्या दुसऱ्याच दिवशी तलाव खुदाईच्या कामाला सुरुवात झाली.जवळपास 3/4 फूट खुदाई झाली.पण पावसाळा सुरु झाल्याने पुन्हा काम बंद झाले.ते आजपर्यंत कांही सुरु झाले नाही. वास्तविक पहाता गेल्यावर्षी पाऊस कमी झाल्याने त्यात पाणीच कमी असल्याने लवकर आटले.म्हणून पुन्हा 5/6 फूट खुदाई केल्यास पाणीसाठा जास्त होईल.त्याचबरोबर त्यातील पाणी संपल्यास राजहंस गडाजवळ आरवाळी धरण आहे तेथील पाणी त्यात सोडल्यास तलाव भरण योजनां पुर्णत्वास जाईल.त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या जमीनीत सतत ओलावा,त्यांच्या शेतातील जनावरांना पीण्यासाठी पाण्याचा प्रश्न मीटत शेतकऱ्यामधे समाधान लाभत सरकारला धन्यवाद देत शेतकऱ्यांना तारणारे सरकार म्हणून नावरुपास येईल.
त्यासाठी शेतकऱ्यांना वरदान ठरणारा शहापूर तलावाची अर्धवट झालेली खुदाई व इतर राहिलेली कामं पुर्णत्वास नेऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी समस्त शेतकरी बंधूतर्फे सरकारला विनंती करत शेतकऱ्यांनीच अस्तित्वात आननेल्या सरकारने समस्या दुर केल्याचे सार्थक होईल.