बेळगाव :
विविध चेक पोस्ट वरती 14 लाखाहून अधिक रक्कम जप्त करण्यात आली आहे पन्नास हजार पेक्षा जास्त रक्कम कोणत्याही व्यक्तीकडे सापडल्यास त्याच्याकडे पुरावा असणे गरजेचे आहे अन्यथा ती रक्कम बदल जप्त करण्यात येत असल्याने रोख रक्कम बदल सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे .ंबेळगाव जिल्ह्यात उभारण्यात आलेल्या विविध चेकपोस्टवर जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करून निवडणुकीच्या काळात बेकायदेशीर कामे करणाऱ्यांना दणका दिला.
काल संध्याकाळी गोकाकच्या घटप्रभा चेकपोस्टवर निवडणूक अधिकाऱ्यांनी कागदपत्रांशिवाय वाहतुक करण्यात येत असलेली १.७० लाखांची रक्कम जप्त केली. काल संध्याकाळी ४ च्या सुमारास कुडची चेकपोस्टवर निवडणूक अधिकाऱ्यांनी कागदपत्रांशिवाय नेत असलेली ९,८६,४८० रुपयांची रोकड जप्त केली. याशिवाय महाराष्ट्राला लागून असलेल्या निपाणी तालुक्यातील कोगनोळी चेकपोस्टवर तीन लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे.