- चेन्नई येथे संपन्न झालेल्या आंतरराष्ट्रीय एशिया पॅसिफिक डाऊन सिंड्रोम फेडरेशन आयोजित जलतरण स्पर्धेत ज्यामध्ये भारतासह इतर दहा देशातील जलतरपटूंनी भाग घेतला त्यामध्ये बेळगावच्या मयांक हलदर याने भारताचे प्रतिनिधित्व करताना दोन सुवर्णपदकांना गवसणी घातली त्याने 50 मीटर फ्रीस्टाइल सुवर्णपदक व 25 मीटर बॅक स्ट्रोक मध्ये सुवर्णपदक मिळवून बेळगावचे नाव संपूर्ण देशात तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकविले याबद्दल आबा स्पोर्ट्स क्लब व हिंदी स्पोर्ट्स क्लब, क्रीडा भारती बेळगाव यांच्यातर्फे त्याचा बेळगाव रेल्वे स्टेशनवर आगमनाच्या वेळेला सन्मान करण्यात आला. या वेळेला मयांकचे आई-वडील तसेच आबा स्पोर्ट्स क्लब चे जलतरण प्रशिक्षक श्री विश्वास पवार, विशाल वेसने, शुभांगी मंगळूरकर, ज्योती पवार, सुधीर धामणकर, मोहन पत्तार , सूर्यकांत हिंडलगेकर, पद्मप्रसाद हुली, गणेश दडीकर, हर्षाली पाटील, अनंत पाटील व इतर मान्यवर क्रीडाप्रेमी उपस्थित होते.


आंतरराष्ट्रीय जलतरण स्पर्धेत बेळगावच्या मयांक हलदरची सुवर्णझेप; दोन सुवर्णपदकांनी देशाचे नाव उज्वल
Related Posts
बेलगाव शहरात बेकायदेशीर लेआऊटवरून वाद; नाल्यालगत झाडतोड व रस्ता बांधकाम
Spread the loveबेलगाव शहरात बेकायदेशीर लेआऊटवरून वाद; नाल्यालगत झाडतोड व रस्ता बांधकाम बेलगाव शहरातील समर्थनगर येथील सर्व्हे नं. 403/1 आणि 403/2 परिसरात बेकायदेशीर लेआऊट उभारणी केल्याचा गंभीर प्रकार समोर आला…
मुतग्यातील भाजीपाला बाजाराचे स्थलांतर; अपघात टाळण्यासाठी प्रशासनाचा निर्णायक निर्णय
Spread the loveमुतगा गावातील भाजीपाला बाजाराचे पुनर्नियोजन; अपघात टाळण्यासाठी प्रशासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय मुतगा गावामध्ये सन 2003 पासून सुरू असलेला भाजीपाला बाजार गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात विस्तारला होता. मात्र छत्रपती…
