मराठा समाजाला न्याय मिळवून देण्याचा एकमेव मार्ग म्हणजे संघटनात्मक शक्ती असून, समाजाला राजकीयदृष्ट्या पोखरण्याचा प्रयत्न कोणीही केला तर त्याला चोख उत्तर दिले जाईल, असा इशारा मराठा समाजाचे गुरु श्री मंजुनाथ भारती स्वामीजी यांनी दिला. सकल मराठा समाज बेळगावचे नेते किरण जाधव यांच्या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
मराठा समाज नेहमी हिंदुत्व आणि सामाजिक कार्यात आघाडीवर राहिला असून, मात्र राजकीय लाभांच्या बाबतीत तो मागे पडत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. आगामी काळात विविध राजकीय पक्षांत विखुरले गेलेले मराठा समाजातील नेते, कार्यकर्ते आणि आजी-माजी लोकप्रतिनिधींना एकत्र करून संघटित ताकद उभी केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. समाजाच्या सुख-दुःखात सहभागी राहणारे नेतृत्वच समाजाचा खरा विश्वास संपादन करू शकते, असे सांगत स्वामीजींनी संघटन, संवाद आणि एकजूट हाच पुढचा मार्ग असल्याचे ठामपणे नमूद केले.

मराठा समाजाला राजकीय ठोकर दिल्यास चोख उत्तर – श्री मंजुनाथ भारती स्वामीजी
Related Posts
आबा व हिंद स्पोर्ट्स क्लब तर्फे भव्य जलतरण स्पर्धांचे आयोजन*
Spread the love*आबा व हिंद स्पोर्ट्स क्लब तर्फे भव्य जलतरण स्पर्धांचे आयोजन* शनिवार दिनांक सात व रविवार दिनांक आठ फेब्रुवारी रोजी गोवावेस महानगरपालिकेच्या जलतरण तलावामध्ये तिसऱ्या पीव्हीआर आंतरराज्य निमंत्रितांच्या जलतरण…
आ. आसिफ (राजू) शेठ यांच्या नेतृत्वाखाली बेळगाव उत्तरमध्ये रस्ते विकासाला गती; लव्ह डेल स्कूल व माळमारुती एक्स्टेन्शनमधील रस्ते पूर्ण
Spread the love आ. आसिफ (राजू) शेठ यांच्या नेतृत्वाखाली बेळगाव उत्तरमध्ये रस्ते विकासाला गती; लव्ह डेल स्कूल व माळमारुती एक्स्टेन्शनमधील रस्ते पूर्ण बेळगाव उत्तर मतदारसंघात आमदार आसिफ (राजू) शेठ यांच्या…
