बेळगाव: स्कायवर्ल्ड एव्हिएशन अॅकॅडमी, बेळगाव येथे आज दुपारी १२ वाजता विद्यार्थ्यांच्या यशाचा गौरव सोहळा उत्साहात पार पडला. प्रमुख पाहुण्या म्हणून मानसिक आरोग्य तज्ज्ञ डॉ. स्फूर्ती मस्तिहोळी उपस्थित होत्या. तसेच अॅकॅडमीचे CEO श्री. विनोद बामणे व श्री सरस्वती इन्फोटेकच्या व्यवस्थापकीय संचालिका सौ. ज्योती विनोद बामणे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
या वेळी निवड झालेल्या विद्यार्थिनींचा विशेष सत्कार करण्यात आला. मिस ज्योती हडपद (गोवा), मिस अन्सबा मुल्ला (हळियाळ), मिस संजना ओवुळकर (दांदेली) व मिस भारती कोलकर (बेळगाव) यांची दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळावर निवड झाली आहे. मिस साक्षी हरकर (गडहिंग्लज, महाराष्ट्र) यांची मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर अकासा एअरलाईनमध्ये सुरक्षा अधिकारी म्हणून निवड झाली असून मिस शाहीनबानू (दांदेली) यांची गोवा आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी निवड झाली आहे.
प्रमुख पाहुण्यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांमध्ये नवी उमेद निर्माण झाली. निवड झालेल्या विद्यार्थिनी व त्यांच्या पालकांचा सन्मान करण्यात आला. संस्थेच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी मिळवलेले हे यश अभिमानास्पद असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.


स्कायवर्ल्ड एव्हिएशन अॅकॅडमीचा यशोत्सव; विद्यार्थिनींची विमानतळांवर निवड
Related Posts
कर्नाटक बारावी निकालात ऐतिहासिक झेप; राज्याचा निकाल ८६.४८% – बेळगावच्या विद्यार्थ्यांचा दमदार ठसा
Spread the loveकर्नाटक शालेय परीक्षा व मूल्यमापन मंडळाने २०२६ च्या बारावी परीक्षेचा निकाल जाहीर केला असून, यंदा राज्याच्या शैक्षणिक गुणवत्तेत ऐतिहासिक सुधारणा झाल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. राज्याचा एकूण निकाल…
जी एस एस पी यु काॅलेजच्या विद्यार्थ्यांचे बारावी वार्षिक परीक्षेत घवघवीत यश
Spread the loveजी एस एस पी यु काॅलेजच्या विद्यार्थ्यांचे बारावी वार्षिक परीक्षेत घवघवीत यश सालाबादप्रमाणे या वर्षी ही जी एस एस पी यु काॅलेजचे विद्यार्थ्यी मोठ्या संख्येने वार्षिक परीक्षेस सामोरी…
