बेळगाव : येथील सुरण्णावर हॉस्पिटल, वेळगाव यांनी वैद्यकीय क्षेत्रात महत्त्वपूर्ण यश संपादन करत बेळगावमध्ये प्रथमच रोबोटिक जॉइंट रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया यशस्वीपणे सुरू केली आहे. या अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे शस्त्रक्रिया अधिक अचूकतेने करता येत असून रुग्णांच्या पुनर्वसनाचा कालावधीही कमी होण्यास मदत होत आहे.
या उपक्रमामुळे सुरण्णावर हॉस्पिटल उत्तर कर्नाटकातील रोबोटिक सहाय्यित अस्थिरोग शस्त्रक्रिया उपलब्ध करून देणाऱ्या अग्रगण्य केंद्रांपैकी एक ठरले आहे. त्यामुळे आता प्रगत जॉइंट रिप्लेसमेंट उपचारासाठी रुग्णांना मोठ्या शहरांकडे धाव घ्यावी लागणार नाही.
याशिवाय हॉस्पिटलने उत्तर कर्नाटकात प्रथमच आंतरराष्ट्रीय प्रशिक्षण फेलोशिप कार्यक्रम सुरू केला आहे. या कार्यक्रमांतर्गत रोमानिया (युरोप) येथील डॉ. ड्रॅगोस मिरोसू यांनी बेळगावमध्ये प्रशिक्षणास सुरुवात केली आहे. आतापर्यंत हॉस्पिटलमध्ये सुमारे १० दुर्मिळ आणि गुंतागुंतीच्या अस्थिरोग शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडल्या असून अनेक शस्त्रक्रिया उत्तर कर्नाटकात प्रथमच करण्यात आल्या आहेत.

बेळगावात प्रथमच रोबोटिक जॉइंट रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया; सुरण्णावर हॉस्पिटलची ऐतिहासिक कामगिरी
Related Posts
दोडवाडा खून प्रकरणाचा पर्दाफाश; तीन आरोपी जेरबंद
Spread the loveबेळगाव : बैलहोंगल तालुक्यातील दोडवाडा गावाजवळ आढळलेल्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाचा उलगडा करत दोडवाडा पोलिसांनी खुनाच्या गुन्ह्यात तीन आरोपींना अटक केली आहे. आरोपींना न्यायालयासमोर हजर करण्यात आले असून त्यांना…
श्री मंगाई देवी यात्रा उत्सव २०२६ ची जय्यत तयारी, १० जुलैला देवीचे गाऱ्हाणे, ११ ऑगस्टला मुख्य यात्रा उत्सव;
Spread the loveबेळगाव : परिसरातील श्रद्धास्थान असलेल्या श्री मंगाई देवीचा वार्षिक यात्रा उत्सव २०२६ यंदाही मोठ्या भक्तिभाव आणि उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. यात्रा उत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात…
