बेळगाव पोलिसांची सायबर गुन्ह्यांवर मोठी कारवाई; ‘म्युल अकाउंट’ जाळे उघड


बेळगाव : सायबर गुन्ह्यांविरोधात बेळगाव पोलिसांनी मोठी मोहीम राबवत हरवलेले मोबाईल शोधण्यासोबतच ‘म्युल अकाउंट’चे जाळे उघडकीस आणले आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक के. रामराजन यांच्या मार्गदर्शनाखाली ‘CEIR’ (Central Equipment Identity Register) पोर्टलच्या माध्यमातून आतापर्यंत 1,051 हरवलेले मोबाईल ट्रॅक करण्यात आले असून, त्यापैकी 51 चोरीचे मोबाईल शोधून मालकांना परत करण्यात आले आहेत.
सायबर गुन्ह्यांच्या तपासादरम्यान 90 हून अधिक प्रकरणांशी संबंधित मोठे जाळे समोर आले असून, कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाल्याचे उघड झाले आहे. विशेषतः ‘म्युल अकाउंट’च्या माध्यमातून फसवणूक होत असल्याचे निष्पन्न झाले आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना आमिष दाखवून त्यांच्याकडून बँक खाते, एटीएम कार्ड आणि सिमकार्ड घेऊन त्याचा गैरवापर केला जात असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.
निपाणी, चिक्कोडी आणि रामदुर्ग परिसरात गुप्त कारवाई करत अनेक संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. संशयास्पद खात्यांची यादी तयार करण्यात आली असून पुढील तपास वेगाने सुरू आहे.
दरम्यान, मोबाईल हरवल्यास त्वरित ‘CEIR’ पोर्टलवर तक्रार नोंदवावी तसेच कोणालाही आपले बँक खाते, एटीएम किंवा सिमकार्ड देऊ नये, अन्यथा गुन्ह्यात अडकण्याची शक्यता आहे, असा इशारा एसपी के. रामराजन यांनी दिला आहे.
बेळगाव पोलिसांची सायबर गुन्ह्यांवर मोठी कारवाई; ‘म्युल अकाउंट’ जाळे उघड
Related Posts
गणपती मंदिर ते हिंडलगा रोडपर्यंत रस्ता विकास कामाला सुरुवात; आमदार आसिफ शेठ यांचा पुढाकार
Spread the loveगणपती मंदिर ते हिंडलगा रोडपर्यंत रस्ता विकास कामाला सुरुवात; आमदार आसिफ शेठ यांचा पुढाकार बेळगाव : गणपती मंदिर ते हिंडलगा रोड या सुमारे 800 मीटर लांबीच्या महत्त्वाच्या रस्ता…
गरजू विद्यार्थ्यांना शांताई विद्या आधारचा हातभार; शिक्षणासाठी 20 हजारांची मदत
Spread the love गरजू विद्यार्थ्यांना शांताई विद्या आधारचा हातभार; शिक्षणासाठी 20 हजारांची मदत बेळगाव : आर्थिक अडचणीमुळे शिक्षणापासून वंचित राहू नये या उद्देशाने शांताई विद्या आधार संस्थेने दोन गरजू विद्यार्थ्यांना…
