Spread the love

बेळगाव येथील स्मार्ट सिटी लिमिटेड कार्यालयासमोर मंजुनाथ आर. बनशंकरी यांनी आज (3 एप्रिल) सकाळी 11 वाजल्यापासून अनिश्चितकालीन संविधानिक उपोषणाला सुरुवात केली आहे. राज्य शासनाचे सातत्यपूर्ण दुर्लक्ष, प्रशासकीय अकार्यक्षमता आणि बेकायदेशीर नियुक्त्यांविरोधात हा लढा उभारल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
मुख्यमंत्री आणि मुख्य सचिव कार्यालयाकडे वारंवार पाठपुरावा करूनही अपात्र व्यवस्थापकीय संचालकांवर कारवाई न झाल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच, 2024 मध्ये जाहीर केलेला 40 टक्के निधी अद्याप न मिळाल्याने प्रकल्प अडचणीत आल्याचे त्यांनी सांगितले.
सद्यस्थितीतील व्यवस्थापकीय संचालकांची तात्काळ हकालपट्टी आणि राज्याचा 40% निधी मंजूर करणे, या प्रमुख मागण्यांसाठी बनशंकरी उपोषणावर ठाम आहेत. मागण्या पूर्ण होईपर्यंत अन्न-पाणी त्यागून उपोषण सुरू ठेवण्याचा इशाराही त्यांनी दिला असून, नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी पाठिंबा द्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.