बेळगाव : सार्वजनिक वाचनालयातर्फे गुरुवार, ११ जून रोजी थोर साहित्यिक, समाजसेवक व बालकांचे लाडके लेखक साने गुरुजी यांच्या ७६ व्या पुण्यतिथीनिमित्त स्मृतिदिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी वाचनालयाचे अध्यक्ष नेताजी जाधव यांच्या हस्ते साने गुरुजींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमात वाचनालयाचे ज्येष्ठ सदस्य अभय याळगी तसेच प्रा. विनोद गायकवाड यांनी साने गुरुजींच्या जीवनकार्याचा आणि त्यांच्या साहित्यिक व सामाजिक योगदानाचा आढावा घेत उपस्थितांना मार्गदर्शन केले.
याप्रसंगी वाचनालयाचे उपाध्यक्ष रघुनाथ बांडगी, सहकार्यवाह प्रसन्न हेरेकर, सदस्य अॅड. आय. जी. मुचंडी, सौ. सुनीता मोहिते, विशाल राऊत आणि अर्जुन गावडे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी कार्यवाह सौ. लता पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले.
फोटो : साने गुरुजींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करताना वाचनालयाचे अध्यक्ष नेताजी जाधव. समवेत पदाधिकारी व सदस्य.
सार्वजनिक वाचनालयात साने गुरुजींची ७६ वी पुण्यतिथी श्रद्धापूर्वक साजरी
Related Posts
सेंट पॉल्स हायस्कूलमध्ये क्रीडा स्पर्धांचा शुभारंभ; जागतिक विक्रमवीर श्रीश चव्हाणचा विशेष सत्कार
Spread the love सेंट पॉल्स हायस्कूलमध्ये क्रीडा स्पर्धांचा शुभारंभ; जागतिक विक्रमवीर श्रीश चव्हाणचा विशेष सत्कार बेळगाव : येथील सेंट पॉल्स हायस्कूल, कॅम्प येथे शुक्रवारी (१३ जून) आंतरगृह क्रीडा स्पर्धा तसेच…
सेंट पॉल्स हायस्कूलमध्ये क्रीडा स्पर्धांचा शुभारंभ; जागतिक विक्रमवीर श्रीश चव्हाणचा विशेष सत्कार
Spread the loveबेळगाव : येथील सेंट पॉल्स हायस्कूल, कॅम्प येथे शुक्रवारी (१३ जून) आंतरगृह क्रीडा स्पर्धा तसेच सहशालेय उपक्रम क्लबच्या उद्घाटन समारंभाचे उत्साहपूर्ण वातावरणात आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला…
