Spread the love

बेळगावीः

बेळगावने भारताला चार ऑलिंपिक हाॅकी खेळाडू दिले परंतु कर्नाटक शासनाने बेळगावसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे हाॅकी मैदान अद्याप दिलेले नाही, यासाठी जिल्हा प्रशासनाने तातडीने हाॅकी बेळगाव संस्थेची ॲस्ट्रोटर्फ मैदानाची मागणी पूर्णत्वास न्यावी असे निवेदन संस्थेतर्फे सचीव सुधाकर चाळके यांनी आज पालक मंत्री सतीश जारकीहोळी यांना दिले.

बेळगांव हे हाॅकी प्रेमींचे माहेरघर आहे. आज जिल्ह्यात 500 हून अधिक खेळाडू हाॅकीचा नित्यनेमाने सराव करीत आहेत, परंतु ॲस्ट्रोटर्फ मैदानाची कमतरता असल्याने राष्ट्रीय स्तरावर पोहोचू शकत नाहीत ही वस्तुस्थिती आहे अशी माहिती सचिव सुधाकर चाळके यांनी सांगितली.

यावेळी सचिव सुधाकर चाळके, उपाध्यक्ष विनोद पाटील, प्रकाश कालकुंद्रीकर, मनोहर पाटील, नामदेव सावंत, केपीसीसी सदस्या आयेशा सनदी आदी उपस्थित होते.