Spread the love

बेळगाव :

आज कालच्या जीवनात नवीन पिढी स्वतःचं करिअर याकडे जास्त लक्ष देत आहे त्यामुळे उशिरा लग्न आणि युवतींना उशिरा मातृत्व लाभतं .वयाच्या 30 वर्षाच्या आत लग्न होऊन मूल झालं पाहिजे वयाच्या ३० नंतर शरीरामध्ये जे काही बदल होत जातात त्याच्यामुळे डिलिव्हरी मध्ये अडचणी निर्माण होतात. करिअरच्या नावाखाली युवा पिढीचा आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे योगाचाही त्यांच्यामध्ये अभाव आहे.

आपलं जीवन सुखमय व्हायचं असेल तर आपलं कुटुंब सासू-सासरे संसार या सर्वाचा समतोल राखणं आवश्यक आहे. आरोग्याकडे दुर्लक्ष करण्यामागे महिलांमध्ये अनेक रोग अल्पवयामध्येच बळावत आहेत त्यासाठी पोषक आहार, योगा यांची गरज आहे असे महिला दिनानिमित्त तारांगण आयोजित कर्तुत्वाचा कौतुक सोहळा या कर्तुत्वान महिलांच्या कौतुक सोहळ्याच्या वेळी महिलांना मार्गदर्शन करताना म्हटले आहे.

व्यासपीठावर व्याख्या त्या डॉक्टर मंजुषा गिजरे, ज्येष्ठ साहित्यिका प्रा. स्वरूपा इनामदार, तारांगणच्या संयोजिका अरुणा गोजे पाटील कर्तुत्वान महिला सत्कारमूर्ती प्राचार्य संगीता देसाई, डॉक्टर सुरेखा पोटे, मथुरा तेरसे, डॉक्टर अश्विनी मांगले, गौरी हेरेकर लटकन, स्वाती खटावकर, प्रतिभा सडेकर, मनीषा सनाईक, आशा पत्रावळी उपस्थित होत्या. कार्यक्रमाचा आरंभ सरस्वती पूजन व रोपट्याला पाणी घालून करण्यात आला. अंजली देशपांडे यांनी विशेष स्तवन सादर केले. अस्मिता आळतेकर यांनी प्रास्ताविक केले तारांगण कार्यकारणीने पाहुण्यांचे स्वागत केले. पाहुण्यांच्या व लेखिकांच्या हस्ते सत्कार मूर्तींचा सत्कार करण्यात आला.

सरस्वती वाचनाच्या अध्यक्ष स्वरूपा इनामदार यांनी तारांगण आयोजित केलेले कार्यक्रम साहित्यिक सामाजिक सांस्कृतिक आणि समाजाला वैचारिक स्वरूपाचे असतात त्यामुळे महिलांना दिशा देण्याचे कार्य तारांगण तर्फे होते अशा शब्दात तारांगणचे कौतुक करण्यात आले.
सत्कारमूर्तींनी सत्काराबद्दल तारांगण जननी ट्रस्ट व अखिल भारतीय साहित्य परिषदेचे आभार मानले. अस्मिता देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले स्मिता चिंचणीकर यांनी आभार मानले. यावेळी तारांगण कार्यकारणी जयश्री दिवटे, स्मिता मेंडके, सविता वेसने अर्चना पाटील, नेत्रा मेनसे, गीता घाडी, प्रायोजिका नयन मंडोळकर, लेखिका प्राध्यापिका मनीषा नाडगोडा, स्मिता कीलेकर, शितल पाटील, यशोदा कारेकर, रेखा कुंभार, प्रियांका धामनेकर व तारांगण परिवाराचे इतर सदस्य उपस्थित होते.