बेळगाव :
आधीच चाऱ्याचा तुटवडा त्यात दुष्काळाने शेतकरी होरपळलेला असतानां त्याचा सामना करत जगतोय.त्यात शेतातील गवत गंजानां आगी लावण्याच कारस्थान कांही समाजकंटक करतानां सर्रास दिसत आहे. मागे येळ्ळूर शिवारातील अनेक वाळल्या चाऱ्याच्या तसे भाताच्या गंजा जळाल्या आता परत झाडशहापूरमधील शिवारात एकदम पाच गंजाना आग लावल्याने त्या जळून खाक झाल्याने शेतकरी अती संकटात सापडले आहेत.भरमा गोरल यांच्या दोन गंजा,नारायण गोरल यांची एक गंजी तसेच येळ्ळूर शेतकऱ्यांच्या त्या शिवारातील दोन गंजा जळून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरकारने आर्थिक मदत करण्यासाठी तलाठ्यामार्फत पंचनामा करुन तहशिलदारनी सरकार दरबारी प्रयत्न करुन शेतकऱ्यांना मदत मीळवून द्यावी अशी शेतकऱ्यातून मागणी होत आहे.