Spread the love

बेळगाव :

बिर्ला इंटरनॅशनल स्कूल बेळगाव, सुरुवात करीत आहे, आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची मुले आणि देशसेवेसाठी हुतात्मा झालेल्या सैनिकांच्या मुलांच्या संपूर्ण मोजत शिक्षणाची योजना.

‘बिर्ला इंटरनॅशनल स्कूत’ बेळगाव, सुरू करीत आहे जळगाव शहरातील एका हॉटेलमध्ये आयोजित पत्रकार परिषद मध्ये माहिती देण्यात आली ते पुढे म्हणाले की! एक परिवर्तनकारी योजनाआहे, आत्महत्या केलेल्या दुर्दैवी शेतक-यांच्या मुलांसाठी आणि देशासाठी प्राण दिलेल्या सैनिकांच्या मुलांसाठी संपूर्ण शिक्षण मोफत देण्याची योजना, आमचा हा उपक्रम सर्वांनाच गुणवत्तापूर्ण शिक्षण उपलब्ध करून देण्याबद्दलची आमची सामाजिक बांधिलकी आणि प्रतिवद्धता निर्देशित करतो.

वर उल्लेखित दुर्वत घटकांच्या व हुतात्मा सैनिकांच्या मुलांना सर्वसमावेशक सहाय्य करण्यासाठी आणि त्याचबरोबर अनाथ मुलांसाठी, आम्ही मोफत प्रशिक्षण वर्ग चालविणे, आणि त्यांना येण्या-जाण्यासाठी मोफत परिवहन सुविधा उपलब्ध करणे, या गोष्टीसुद्धा करणार आहोत. आम्हाला सांगायला अभिमान वाटतो की, दहा अनाथ मुलांसाठी आम्ही अहमदाबादच्या ‘सायन्स सिटी’ची मोफत सहल प्रायोजित करणार आहोत. याशिवाय पत्रकारांच्या अमोल कार्याची दखल घेऊन, आम्ही त्यांच्या मुलांना भरपूर शैक्षणिक सवलती देणार आहोत.

शैक्षणिक सुविधांमध्ये आमुलाग्र बदल करण्याबरोबरच, संपूर्ण शाळेता वातानुकूलित करणारी, ‘बिर्ता इंटरनॅशनल स्कूल’ ही वेळगावीमधील पहिली शिक्षण संस्था ठरणार आहे. काँग्रेस रोड, बेळगाव, येथील किरण एअरकॉन’च्या सहयोगाने हवेच्या प्रदूषण नियंत्रणासह अत्याधुनिक वातानुकूलन व्यवस्था प्रत्येक वर्गामध्ये उपलब्ध केली जाणार आहे, यातून, विद्यार्थ्यांचे शारीरिक स्वास्थ्य आणि सुखद वातावरण याबद्दलची आमची प्रतिबद्धता दिसून येते.

डॉक्टर मनजीत जैन (शाळेचे संस्थापक) म्हणाले की, “शाळेमध्ये करण्यात आलेल्या या अमुलाग्र बदतांमधून, तसेच असाधारण सुविधा उपलब्ध करून देण्यामधून, व्यवस्थापक मंडळाचा पुरोगामी दृष्टिकोन दिसून येतो. संपूर्ण शाळेच्या वातानुकूलनाबरोबरच उत्तम शिक्षण प्रदान करण्यासाठी सर्व वर्गामध्ये नवीनतम तंत्रज्ञानाचा उपयोग करून त्यांचे स्मार्ट फ्तासरूम मध्ये रूपांतर केले आहे.”

“आमच्या पर्यावरणीय अग्रसरतेला आणखी एक पाऊल पुढे नेण्यासाठी, आम्ही होळीच्या काळात पाच हजार वृक्षांचे रोपण आणि ‘सीड बॉल्स’चे वितरण करून, सभोवतालच्या निसर्गाचे संरक्षण आणि संवर्धन करण्यामध्ये सहभाग घेणार आहोत. या व्यतिरिक्त आम्ही तीन अनाथाश्रमातीत विद्यार्थ्यांना कौशल्य विकास प्रशिक्षण देऊन त्यांना उज्वल भविष्यासाठी विविध कौशल्ये शिकविणार आहोत.

आमच्या या बहुआयामी शिक्षण पद्धतीमधून आमची शिक्षणाबाबतची आणि सामाजिक कर्तव्यांबद्दलची प्रतिवद्धताच दिसून येते. आमच्या या परिवर्तनकारी उपक्रमांमधून, विद्यार्थ्याला त्याच्या शैक्षणिकV उन्नतीसाठी जरूर असलेल्या सर्व बाबी मिळतातच पण त्याबरोबरच इतर अनेक सुविधा मिळून त्यांची सर्वांगीण प्रगती होते. असेही यावेळी सांगण्यात आले यावेळी स्कूल मुख्याध्यापिका व कर्मचारी वर्ग उपस्थित होता