Spread the love

बेळगाव :

काँग्रेस पक्षामध्ये बेंगलोर ते बेळगाव पर्यंत कुटुंब राजकारण सुरू आहे कुरबुर समाजाला चॉकलेट देऊन समाधान केल्याचा गंभीर आरोप काँग्रेस पक्षाचे माजी आमदार रमेश कुडची यांनी केला आहे . येणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी आता चिकोडी मतदार संघातून प्रियांका जारकीहोळी तर बेळगाव मतचोत्रातील लोकसभा उमेदवार म्हणून मृणाल हेबाळकर यांचे नाव अधिकृत घोषित करण्यात आले आहेत, यांना शुभेच्छा देतो असे म्हणत रमेश कुडची पुढे म्हणाले की तीन महिन्यापूर्वी कुरबुर समाजाचा समावेश बेळगावात झाला असता यावेळी कुरबुर समाजाला येत्या लोकसभे च्या निवडणुकीमध्ये एक उमेदवार देतो असे पालकमंत्री यांनी जाहीर सभेत म्हटले होते,

तेही मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या समक्ष बोलले होते, पण बोलले एक केले गेले एक हे स्पष्ट झाले आहे, काँग्रेस पक्षामध्ये कुरबुर समाजावर अन्याय होत असल्याचे आता स्पष्ट झाल्याचे ही ते म्हणाले, नुकताच काँग्रेस पक्ष्याच्याचे चिकोडी जिल्हाध्यक्ष लक्ष्मणराव पिंगळे यांची बुडा अध्यक्षपदी निवड करून समाधान केले पण कुरबुर समाजाला मात्र गाजर दाखवूनच अंधारात ठेवले असल्याचे रमेश कुडची म्हणाले , काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता व माजी आमदार या नात्याने मला कुरबुर समाज विचारत आहे की तुम्ही याचा जॉब का विचारत नाही, पण पक्षामध्ये कुटुंब राजकारण सुरू असल्याने मनमानी चालले असल्याचे यावेळी रमेश कुडची आणि गंभीर आरोप केला आहे,

कुरबुर समाजामध्ये मातब्बर नेते असताना देखील लोकसभेच्या निवडणुकीला सामोरे जाणारा नेता कोणीच नसल्याचेही पालकमंत्री बोलत असल्याचे कुडाची यांनी नाव न घेता यांनी आरोप केला आहे, लोकसभेसाठी अमरसिंह पाटील, रमेश कुडची आणि लक्ष्मणराव चिंगळे यांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली होती पण कोणीच नसल्याचे पालकमंत्री सांगत आहेत, आपल्या परिवारातील उमेदवारासाठी वर्णी लावली आहे असे राजकारण योग्य नाही असेही ते म्हणाले, एकाच दिवसांमध्ये लक्ष्मणराव चिंगळे यांना बुडा चेअरमन पदी निवड करून पद ही हस्तांतर केले गेले पण लोकसभेच्या निवडणुकीसाठी भक्कम असणाऱ्या लक्ष्मणराव चिंगळे यांना गाजर दाखावले आणि त्यांच्या हाती चॉकलेट देऊन त्यांना खुश केले असेही ते म्हणाले, पण कुरबुर समाजामध्ये मातब्बर नेते असताना देखील जाणून मोजून अन्याय केला गेला असल्याचे रमेश कुडची म्हणाले, उत्तर मतक्षेत्राचे आमदार राजू शेठ हे काँग्रेस दक्षिण मतक्षेत्राचे अध्यक्ष आहेत यांनीही या भागातील कुरबुर समाजाचा विचार केला नाही, चिकोडी मतक्षेत्रातील एखादा व्यक्ती बेळगाव बुडा कार्यक्षेत्रामध्ये विकास कसे करणार बेळगाव मध्ये दुसरा कोणी नेता नाही का ? असे ही ते म्हणाले, बेळगाव बुडाकारिक क्षेत्राचा विकास कसा साधला जाणार हा यक्षप्रश्न साऱ्यासमोरच आहे असे म्हणत पुढची यांनी काँग्रेस पक्षामध्ये चाललेल्या मनमानी बदल नाराजी व्यक्त केली आहे, यापुढेही असेच चालले तर निश्चितच काँग्रेस पक्षाची मोठी हानी होणार असल्याचे भाकीत यावेळी बोलून दाखवले,