Spread the love

बेळगाव:

बेळगाव लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार मृणाल हेब्बाळकर यांनी आज रविवारी सकाळी हिंडलगाव येथील गणपती मंदिर मध्ये पूजा अर्चा करून प्रचार बाईक रॅलीला प्रारंभ केला या रॅलीमध्ये मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर व आमदार चनाराज हट्टीहोळी माजी एपीएमसी अध्यक्ष युवराज कदम सह बहुसंख्य काँग्रेस कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत ही बाईक रॅली हिंडलगा गणपती मंदिर पासून सुरुवात करण्यात आली, यानंतर डॉ बाबासाहेब आंबेडकर गार्डनला येताच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून पुन्हा ही रॅली राणी कित्तूर चन्नम्मा सर्कल येथे आली, आणि वीर राणी कित्तूर चन्नम्मा पुतळ्याला हार अर्पण करून आरटीओ सर्कल मार्गे रॅली निघाली,यानंतर छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमेला हार अर्पण करण्यात आला यानंतर बसवेश्वर सर्कल कडे निघाले आणि विश्वगुरू संत श्री बसवेश्वर यांना अभिवादन करून त्यांचा आशीर्वाद घेतला, यानंतर धर्मवीर संभाजी चौकात संभाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्प हार अर्पण करून आपल्या प्रचाराचा खऱ्या अर्थाने शुभारंभ केला . भव्य दुचाकी रॅली मध्ये काँग्रेस पक्षाचे ध्वजा बरोबर भगवा ध्वज ही पाहायला मिळाला , एकीकडे भाजपचा बेळगाव लोकसभा मतदारसंघातला उमेदवार जाहीर व्हायचा बाकी असताना काँग्रेसने मात्र प्रचार फेरी काढून प्रचाराला सुरुवात केली आहे.काँग्रेसने कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने रॅलीत सहभागी होऊन उमेदवार मृणाल हेब्बाळकर यांचा जयजयकार करत निघालेले कार्यकर्ते साऱ्यांचे लक्ष वेधून घेत होते. दरम्यान रॅलीमध्ये काँग्रेसचे पक्ष चिन्ह असलेल्या ध्वजांच्या तुलनेत भगवे ध्वजच जास्त दिसत होते. नुकताच कारवार मतदार क्षेत्रामध्ये उमेदवारी घोषित झालेल्या खानापूरच्या माजी आमदार अंजलीताई निंबाळकर यांनीही शनिवारी खानापुरातून प्रचाराचा नारळ फोडला आहे तर चिकोडी मतदार क्षेत्रामध्ये उमेदवार प्रियंका जारकीहोळी याही गप्प बसल्या नाहीत आपापल्या परीने काँग्रेसचे उमेदवार प्रचारात जोर घेत आहेत.