Spread the love

बेळगाव :

बेळगाव लोकसभा उमेदवार घोषित करण्यास भाजपाच्या हायकमंडाने वेळ लावला यामुळे बेळगाव स्थानिक उमेदवाराला उमेदवारी घोषित करतील या अपेक्षित राहिलेल्यांची मात्र निराशा झाली आहे,काही दिवसांपूर्वी माजी मुख्यमंत्री जगदीश शटर यांनाच उमेदवारी मिळणार असे खात्रीदायक वृत्त मिळताच बेळगाव स्थानिक नेते व कार्यकर्त्यांमध्ये शटर गो बॅक असा चर्चात्मक विषय बनला होता ,पण यावर आता पडदा पडला आहे,बहुप्रतीक्षित भाजपच्या उमेदवारीचा तिढा काल सुटल्यानंतर बेळगाव लोकसभा मतदार संघासाठी माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांची उमेदवारी निश्चित झाली.उमेदवारी जाहीर होताच निवडणुकीसाठी पुढील रणनीती ठरविण्यासाठी उमेदवार आणि कार्यकर्त्यांमध्ये प्रचाराची लगबग सुरु झाली.

माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांना उमेदवारी देण्यावरून बेळगावमध्ये अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. स्थानिक उमेदवाराला प्राधान्य देण्यात यावे या मागणीसाठी ‘शेट्टर गो बॅक’चे नारे देण्यात आले.

मात्र आधीपासूनच हायकमांडने शिक्कामोर्तब केलेल्या माजी मुख्यमंत्र्यांच्या उमेदवारीवर अखेरचा निर्णय रविवारी जाहीर करण्यात आला. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आता माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर हे येत्या बुधवारपासून प्रचाराला सुरुवात करणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.यासंदर्भात हुबळी येथे पत्रकारांशी बोलताना जगदीश शेट्टर म्हणाले, कि हुबळी माझी जन्मभूमी असली तरी बेळगाव हि माजी कर्मभूमी आहे. होळी सण असल्याने मी बेळगावला गेलो नाही. मात्र बुधवारपासून मी प्रचाराला सुरुवात करणार आहे. बेळगावमध्ये आजवर मी बरीच कामे केली आहेत.
माझ्या विरोधार्थ निवडणूक लढविणारा काँग्रेसचा उमेदवार तरुण आहे. परंतु त्याला कमी लेखण्याची कोणतेही कारण नाही. सर्व स्तरावरील लोकांचा विश्वास संपादित करून मी बेळगावमधून नक्कीच विजयी होईन, असा मला विश्वास आहे.

शिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा पंतप्रधानपदी निवडून आणायचे आहे. याच अनुषंगाने निवडणुकीचे गांभीर्य लक्षात घेऊन आपण सर्वांनी कामाला लागले पाहिजे, असे मत जगदीश शेट्टर यांनी व्यक्त केले.

हे सारे खरे असले तरी माजी मुख्यमंत्री जगदीश शटर यांनी भाजपाच्या सर्वच नेत्यांना भाजपाच्या प्रचारात समाविष्ट करून घेतले तर मात्र सध्या हिंदुत्व आणि राम जन्मभूमी याबरोबर प्रधानी नरेंद्र मोदी या प्रमुख तीन मुद्द्यावर भाजपाची पकड निश्चितच यशस्वी ठरणार आहे यामुळे जगदीश शटर सर्वांच्या बरोबर हात मिळवणी करण्यास यशस्वी झाले तर मात्र विजयाच्या नांदीच्या दिशेने पाऊल निश्चित पडू शकते यात शंका नाही.