बेळगाव:
वटपौर्णिमेच्या दिवशी महिला उपवास करतात व वटवृक्षाची पूजा करून आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात. त्याचप्रमाणे आज वटपौर्णिमेचे औचित्य साधून एंजल फाउंडेशनच्या वतीने शहरातील महिला मंडळांना एकत्रित बोलून वटपौर्णिमा साजरी करण्यात आली व महिलांची ओटी भरण्याचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगरसेविका वैशाली हुलजी तसेच विश्वकर्मा सेवा संघाचे अध्यक्ष रमेश दिसुरकर हे उपस्थित होते.
दीप प्रज्वलन तसेच वटवृक्षाची पूजा करून कार्यक्रमाला चालना देण्यात आली. त्यानंतर एंजल फाउंडेशनच्या संस्थापिका अध्यक्ष मीनाताई बेनके यांनी उपस्थित असलेल्या महिला मंडळाच्या महिलांची ओटी ओटी भरली.
याप्रसंगी एंजल फाउंडेशनचे उपाध्यक्ष दीपक सुतार, खजिनदार सोमशेखर हुल्लेंनावर, फाउंडेशनचे सदस्य भारती बुडवी, प्रसाद संकन्नवर, रेणुका होसुर,शशिकला जोशी तसेच शहरातील महिला मंडळांच्या सदस्य मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित होत्या.