बेळगाव :
महाराष्ट्र एकीकरण समितीने लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार दिला तर त्याच्या पाठीशी खंबीरपणे राहून व आदेश दिला तर लढायलाही तयार आहे , असे युवा नेते शुभम शेळके यांनी म्हटले आहे, महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीमध्ये एक उमेदवार द्यायचा की पाचशे उमेदवार द्यायचे हे अद्याप स्पष्ट झाले नसले तरी महाराष्ट्र एकीकरण समितीने 21 जणांची शिष्टमंडळ तयार केली असून हे शिष्ट मंडळ जो निर्णय देईल त्याचे पालन करण्याचे या पूर्वीपासून प्रामाणिक प्रयत्न महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सर्वांनीच केले आहे, यापुढेही ते निश्चितच करणार असे म्हणत येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये यावर 21 जणांचे शिष्ट मंडळ मंडळ निर्णय घेईल असे युवा नेते शुभम शेळके म्हणाले,