Spread the love

बेळगाव :

लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र एकीकरण समितीचा उमेदवार बेळगाव मधून निवडणूक लढवणार असल्याचा निर्णय तालुका व शहर समिती बैठकीमध्ये घेण्यात आला बेळगाव शहरातील मराठा मंदिर येथे शुक्रवारी आयोजित बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आलामहाराष्ट्र एकीकरण समितीचा लोकसभा उमेदवार निवडीसाठी 32 जणांची कमिटी जाहीर करण्यात आली आहे. बेळगाव शहर दक्षिण उत्तर आणि ग्रामीण मतदारसंघातील समितीच्या 32 कार्यकर्त्यांची निवड समिती सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे.
सुरुवातीला 21 जणांची कमिटी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता मात्र सुधारित कमिटी करून बेळगाव उत्तर मधील 11 दक्षिण मधील 11 आणि ग्रामीण मधील 10 अशा 32 जणांची निवड समिती करण्यात आली आहे.

शुक्रवार दि. २९ मार्च रोजी कार्यकर्त्यांची मते जाणून घेण्यासाठी तसेच लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रणनीती आखण्यासाठी शहर आणि तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक बोलाविण्यात आली होती.

 

सुरुवातीला 21 जणांची यादी करण्यात आली होती मात्र काही जणांनी यात आक्षेप घेतल्यामुळे सदर निवड कमिटी 32 जणांची करण्यात आली
बेळगाव लोकसभा महाराष्ट्र एकीकरण समिती उमेदवार निवडीसाठी 32 जणांची निवड कमिटी अशी
बेळगाव उत्तर
मदन बामणे
दत्ता जाधव
अमर येळळूरकर
सुरज कणबरकर
अंकुश केसरकर
शुभम शेळके
रणजीत चव्हाण पाटील
विकास देसुरकर
मोतेश बारदेशकर
विकास कलघटगी
रमेश पावले
बेळगाव दक्षिण
राजू बिर्जे
मनोहर हलगेकर
राकेश पलंगे
सागर पाटील
प्रमोद पाटील येळूळर
रणजीत हावळानाचे
श्रीकांत कदम
बाळू केरवाडकर धामणे
पप्पू कुर्याळकर(उमेश)
रमेश माळवी
पांडू पट्टण
बेळगाव ग्रामीण
राजाभाऊ पाटील
आर् एम चौगुले
एम जी पाटील
मनोहर किणेकर
रामचंद्र मोदगेकर
शिवाजी सुंठकर
सुधीर चव्हाण
आर आय पाटील
आर के पाटील
मनोहर संताजी
32 जणांच्या कमिटीमध्ये जो निर्णय घेतला जाईल हा निर्णय अंतिम राहणार असून इच्छुक उमेदवार निवडण्याची प्रक्रिया येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये प्रामुख्याने जनतेच्या समोर येणार आहे यामुळे बेळगाव लोकसभा मतक्षेत्रामध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीने आपला उमेदवार निश्चित केल्याने राष्ट्रीय पक्षांना त्याचा मोठा धक्का बसणार आहे यामुळे महाराष्ट्र एकीकरण समितीच्या झेंड्याखाली सर्वांनी एकत्रित येऊन आपल्या न्याय हक्कासाठी प्रामाणिक प्रयत्न करणे काळाची गरज आहे