Spread the love

बेळगाव :

उत्तर प्रदेश येथील नोएडा या ठिकाणी झालेल्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत कंग्राळी खुर्द गावातील कल्याणी परशराम पाटील हिने रौप्य पदक पटकाविले. कर्नाटक राज्यातून कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली होती. त्यामध्ये कल्याणी पाटील हिने अंतिम सामन्यापर्यंत मजल मारून रोप्य पदक पटकाविले. तिच्या या यशाचे गावामध्ये कौतुक होत आहे. कल्याणी पाटील ही आंतरराष्ट्रीय महिला कुस्ती अकॅडमी या ठिकाणी आपला सराव करत असते. तिला प्रशिक्षक म्हणून अमोल तोरवे,प्रकाश कोळेकर,बापू कोळेकर व समाधान खांडेकर यांचे मार्गदर्शन लाभले. तिच्या पुढील वाटचालीसाठी श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ शिवजयंती उत्सव मंडळ पाटील गल्ली व श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान कंग्राळी खुर्द यांनी शुभेच्छा दिल्या आहेत