- *येळ्ळूर रोडवर बस थांबवा.अन्यथा……!*
शहरी भागातील वडगाव,शहापूर,अनगोळ,जूनेबेळगावसह शेतकऱ्यांच्या शेतजमीनी येळ्ळूर,धामणे गावच्या मधे शहापूर,येळ्ळूर, धामणे,अनगोळ शिवारात शेती असल्याने येथील शेतकरी महिला सतत येळ्ळूर रोडवरुन बसने प्रवास करतात.आधी पैसे घेऊन तिकिट घेत असल्याने बस वाहच,चालक हवी तेथे बस थांबवत असत पण आता महिलांना बस प्रवास मोफत झाल्याने बस थांबवत नाहित.त्यासाठी रयत संघटनेतर्फे बस मुख्य कार्यालयावर शेतकऱ्यांनी धडक मोर्चा काढून बस आयुक्तांना निवेदन दिले.तेंव्हा त्यांनी ठोस आश्वासन देत येळ्ळूर रोडवरील सिध्दिविनाय मंदीर,बायपास,येळ्ळूर शहापूर शिवार शिम,पोतदार पेट्रोल पंप येथे शेतकऱ्यांनी डेपने दिलेले बोर्डही उभारले.थोडे दिवस बस वाहकांनी बस थांबवायच नाटक केलं.पण आता ऐन भातकापणीवेळी वेळी बस चालक,वाहक बस थांबवत नसल्याने महिलांना संध्याकाळी 5.30 ते 7 पर्यंत थांबून नाईलाजाने वडगाव,शहापूरला तसेच येळ्ळूरला जायची पाळी आली आहे.बस थांब्यावर थांबूनही जर बस थांबत नसेल तर सोमवारी शेतकरी महिला नक्कीच बस अडवून धरत बस अधिकारी येईस्तोवर हालणार नाहीत असा निश्चय केला आहे. त्याचबरोबर सोमवारी शेतकरी मुख्य बस डेपोवर धडक देऊन धरणे धरणार आहेत.
येळ्ळूर रोडवर बस थांबवा.अन्यथा……!*
Related Posts
भारतीय जनता पार्टीचे निष्ठावंत कार्यकर्ते बोकनूर गावचे सुपुत्र श्री गुणवंत सुतार यांची नुकतीच बेळगाव जिल्हा दूरसंचार निगम मंडळ मध्ये सल्लागार समितीवर नेमणूक झाली आहे
Spread the loveभारतीय जनता पार्टीचे निष्ठावंत कार्यकर्ते बोकनूर गावचे सुपुत्र श्री गुणवंत सुतार यांची नुकतीच बेळगाव जिल्हा दूरसंचार निगम मंडळ मध्ये सल्लागार समितीवर नेमणूक झाली आहे, भारतीय जनता पार्टीचे माजी…
महाराष्ट्र कर्नाटक सीमा खटला 2004 पासून प्रलंबित असल्याने येथील तरुण वर्ग बेरोजगारात होरळतोय
Spread the love*मुंबई दौरा* *रोजगार मेळावा* महाराष्ट्र कर्नाटक सीमा खटला 2004 पासून प्रलंबित असल्याने येथील तरुण वर्ग बेरोजगारात होरळतोय.सीमा भागातील बेरोजगार आणि पिचलेल्या तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याचे काम…