Spread the love

मथुरा “फरसा वाला बाबा” हत्या प्रकरणी बेलगावात निवेदन; त्वरित कारवाईची मागणी
बेळगाव : मथुरा येथे घडलेल्या “फरसा वाला बाबा” यांच्या हत्येच्या निषेधार्थ बेलगावात आंदोलनाची नोंद घेण्यात आली. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर तात्काळ कारवाई करावी, तसेच पीडितांना न्याय मिळावा, अशी मागणी करत बेलगावच्या उपायुक्तांना अधिकृत निवेदन सादर करण्यात आले.
या वेळी गो रक्षक निलेश, आनंद नवले, प्रकाश लाडवा, मारुती कोळी, प्रकाश महेश, मनसे स्वयं पाटील, रमेश यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते. संबंधितांनी या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष देऊन त्वरित न्याय मिळवून देण्याची मागणी केली.